Shahaji Bapu Patil: 'माझी रास शिवसेनेची..' शहाजीबापूंचं अजब विधान | Eknath Shinde

Shahajibapu's Comment Sparks Political Reactions: 'मी निवडून यायला पाहिजे होते, मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते' असं विधान शहाजीबापू पाटील यांनी केलं.

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, "मी निवडून यायला पाहिजे होते. मी निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते." शहाजीबापूंनी यापूर्वीच्या राजकीय घटनांचा संदर्भ देत सांगितले की, 1995 मध्ये मी निवडून आलो, तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. 2019 ला निवडून आलो, तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यावरून त्यांनी सूचित केले की, त्यांच्या निवडणुकीतील विजयामुळे मुख्यमंत्रीपदाची समीकरणं घडतात. शिवसेनेबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं, माझी रास शिवसेनेची आहे. पण मी पूर्वी काँग्रेसमध्ये कसा गेलो होतो, ते मला आजही समजत नाही. तसेच, त्यांनी ठामपणे सांगितले की, "महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही." शहाजीबापू पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com