Sharad Koli : ठाकरे गटाला मोठा धक्का! शरद कोळी 1 वर्षासाठी येरवाड्यात; नेमकं प्रकरण काय?

ठाकरे सेनेचे आक्रमक उपनेते शरद कोळींवर सोलापूर पोलिसांचा एमपीडीएअंतर्गत सर्जिकल स्ट्राईक; येरवडा कारागृहात रवानगी, ठाकरे गट आक्रमक.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत त्यांना आगामी एका वर्षाच्या कालावधीसाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला असला, तरी यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ माजला आहे. ठाकरे गटाकडून या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात येत असून, हा केवळ राजकीय सूडबुद्धीने घेतलेला निर्णय असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात सातत्याने प्रखर आवाज उठवल्यामुळेच कोळी यांच्यावर ही कारवाई लादल्याचा दावा केला जात आहे. एमपीडीए कायदा म्हणजे नेमके काय, ही कारवाई कशी केली जाते आणि यामागील राजकीय संघर्षाचा नेमका संदर्भ काय, याचा विस्तृत आढावा या विशेष रिपोर्टमध्ये घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com