Ulhasnagar News: Eknath Shinde Shivsena शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार, नेमकं काय घडलं? | Bala Bhagure | Sakal News

Ulhasnagar मधील गरबा उत्सवात सराईत गुंडाचा दहशतवाद; शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्यावर बंदूक रोखत “मी इकडचा भाई” म्हणत धमकी, हवेत गोळीबार करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांकडून गुन्हा दाखल..

Eknath Shinde Shivsena: उल्हासनगरातील एस. एल. 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषदेत शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्या पुढाकाराने गरब्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या उत्सवी कार्यक्रमात स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने अचानक गोंधळ घालून दहशतीचे वातावरण निर्माण केले. गरब्याच्या ठिकाणी पोहोचलेल्या सोहम पवारने थेट बाळा भगुरे यांना अडवत, "गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का? मी इकडचा भाई आहे," असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर त्याने अचानक बंदूक काढत भगुरे यांच्यावर रोखली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com