Worli Hit & Run Case: मुख्य आरोपी मिहीर शाहाला शहापूरमधून अटक

मुंबईतील वरळीत एका भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाहाला आज शहापूरमधून अटक करण्यात आली

मुंबईतील वरळीत एका भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर कार चालवणारा मुख्य आरोपी मिहीर शाह फरार झाला होता. तर त्याला मदत केल्याप्रकरणी त्याचे वडील आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाहांनाही अटक झाली होती. पण त्यांची जामिनावर सुटका झाली. तर, मिहीर शाहाला आज शहापूरमधून अटक करण्यात आली. आणि मिहीरसोबतच त्याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या १२ जणांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.