Fact Check : बँकेच्या कागदपत्रांवर स्ट्रीट फूड विकले जात असल्याचा जुना फोटो व्हायरल; पाहा या दाव्यामागचे सत्य काय?

Fact Check Bank Documents as Street Food Plates : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत बँकेचे गोपनीय दस्तऐवज स्ट्रीट फूडसाठी प्लेट म्हणून वापरले जात असल्याचे दिसते.
Bank Documents Turned into Street Food Plates: Viral Photo Fact Check

Bank Documents Turned into Street Food Plates: Viral Photo Fact Check

esakal

Updated on

Viral Photo Data Privacy Risk : सोशल मीडियावर सध्या एका विचित्र पण तितक्याच धक्कादायक फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण ज्या कागदपत्रांना अत्यंत गोपनीय मानतो, तेच कागद आज रस्त्यावर खाद्यपदार्थ वाढण्यासाठी वापरले जात असल्याचे या पोस्टमध्ये लिहिले आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वरील 'YO YO FUNNY SINGH' या अकाऊंटवरून शेअर केलेल्या या फोटोमध्ये बँकेचे अधिकृत कागदपत्रे चक्क स्ट्रीट फूडसाठी प्लेट म्हणून वापरले जात असल्याचे फोटो दाखवला जात आहे. "भारतात तुमची डेटा प्रायव्हसी तुमच्या स्वतःच्या हातातही नाही," या टॉन्टवाल्या कॅप्शनसह हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. परंतु हा फोटो कितपत खरा आहे की AI जनरेटेड आहे याबद्दल पुष्टी झालेली नाहीये. हा व्हायरल फोटो 2020 मधील असल्याचे म्हंटले जात आहे आणि सध्या अशी कोणतीच घटना घडली नाहीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com