Fact Check: नागपूरचे तापमान खरंच 56 डिग्री सेल्सियस झाले होते का? हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले सत्य

Nagpur Temperature: रामदासपेठस्थित पीडीकेव्हीच्या खुल्या शेतातील मध्यभागी असलेल्या केंद्रावर शुक्रवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी ५३.७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद दाखविण्यात आली.
Nagpur Temperature Fact Check
Nagpur Temperature Fact CheckEsakal

राज्याची उपराजधानी नागपूरमधील रामदासपेठ येथील तापमानमापक केंद्रावर शुक्रवारचे कमाल तापमान तब्बल 56 अंशांवर गेल्याची जोरदार चर्चा होती. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. यामुळे एका क्षणासाठी नागपूरकरांच्या हृदयाचे अक्षरशः ठोके वाढले होते. मात्र, हा आकडा खोटा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दावा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका युजरने तीन फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. यावेळी त्याने म्हटले की, दिल्लीत ५२.९ अंश सेल्सिअसचा विक्रमी तापमान अनुभवल्यानंतर काही दिवसांतच नागपूरचे तापमान आता ५० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. गुरुवारी ते तब्बल ५६ अंश सेल्सिअस उष्णतेच्या लाटेवर पोहोचले होते.

त्याअगोदर, गुरुवारी (३० मे)देखील या केंद्रावर ५६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्याचे वृत्त एका ऑनलाइन वृत्तपत्राने दिले होते.

'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Nagpur Temperature Fact Check
Nagpur Temperature Fact CheckEsakal
Nagpur Temperature Fact Check
Fact Check: उत्तर प्रदेशात भाजपला मत न दिल्याने दलितांवर हल्ला केल्याचा दावा खोटा

सत्य

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली आणि संपूर्ण प्रकरणाबाबत खुलासा केला. हवामान विभागाचे अधिकारी प्रवीणकुमार यांनी सांगितले की, नागपूर शहरात तापमान मोजण्यासाठी एकूण चार सेंटर्स आहेत. यात रामदासपेठ येथील केंद्रांवर नोंदविण्यात आलेले तापमान सेन्सरमध्ये त्रुटी असल्याने ते जास्त दाखविण्यात आले. मात्र याच ठिकाणी मॅन्युअल पद्धतीने तापमान मोजले असता, ते ४५ अंशांच्या घरात होते.

Nagpur Temperature Fact Check
Fact Check: जय शाह, उर्वशी रौतेला यांच्यासोबतच्या व्हायरल फोटोत पाकच्या माजी लष्करप्रमुखांचा मुलगा? 'तो' दावा खोटा

उल्लेखनीय म्हणजे, तीन वर्षांपूर्वी सिव्हिल लाइन्सस्थित जीपिओ चौकातील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या डिजिटल बोर्डवरही नागपूरचे तापमान चुकीने ५० डिग्री दाखवून नागपूरकरांना चांगलाच घाम फोडला होता.

दोन दिवसांपूर्वी दिल्लीतही अशीच घटना घडली होती. उत्तर-पश्चिम दिल्लीतील मुंगेशपूर हवामान केंद्राने त्यावेळी ५२ अंश सेल्सिअसचा बॉम्ब फोडून दिल्लीवासीयांचे टेंशन वाढविले होते. तिथेही तापमानासाठी सदोष सेन्सरच कारणीभूत ठरले होते. तसे स्पष्टीकरण नंतर भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.

निष्कर्ष

30 मे रोजी नागपूरमध्ये तापमानाने 50 अंशाचा पारा पार केला असे सांगणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. मात्र, ई सकाळने या दाव्याबाबतची सत्यता तपासल्यानंतर आढळले की, सेन्सरमध्ये त्रुटी असल्याने चुकीचे तापमान नोंद झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com