
Created By : PTI
Translated By: Sakal Digital Team
सध्या सोशल मीडियावर एक कोलाज फोटो प्रमाणावर व्हायरल होत आहे. या कोलाजमध्ये भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल, त्याची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि त्यांच्या नुकतेच जन्मलेले बाळ दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये राहुल आणि अथिया आपल्या मुलीसोबत असून दुसऱ्या फोटोमध्ये राहुल आपल्या मुलीला कुरवाळताना दिसतोय.
सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत दावा केला जात आहे की, 24 मार्च 2025 रोजी जन्मलेल्या त्यांच्या मुलीचा हा पहिला अधिकृत फोटो आहे. अनेक युजर्सनी हा फोटो शेअर करत राहुल आणि अथियाला अभिनंदन दिले आहे.
एका फेसबुक युजर Jeney Debbarma यांनी 25 मार्च रोजी हा फोटो शेअर केला आणि लिहिले की,
"KL राहुल आणि अथिया शेट्टीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!"
यासोबत त्यांनी फोटो कोलाजदेखील पोस्ट केला.
फॅक्ट चेक केले असता या फोटोंची सत्यता पडताळून पाहिले असता हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.
Google Lens वर या फोटोंचे रिव्हर्स सर्च केल्यानंतर असे आढळले की, हे फोटो इतर अनेक युजर्सनीही याच दाव्यासह शेअर केले आहेत. यातील काही पोस्ट्सची लिंक इथे आणि इथे पाहा. अर्काइव्ह इथे आणि इथे पाहा.
Fact Check Desk ने कोलाजमधील दोन्ही फोटो बारकाईने तपासले. यात काही महत्त्वाच्या विसंगती आढळल्या. के. एल. राहुल आणि अथिया शेट्टीच्या चेहऱ्यावरील काही भाग नैसर्गिक दिसत नाही. बाळाच्या चेहऱ्याची रचना ही सामान्य फोटोंपेक्षा वेगळी होती.
संपूर्ण फोटोला एक प्रकारचा "ग्लॉसी फिनिश" होता, जो बहुतांश वेळा AI-Generated इमेजेसमध्ये आढळतो.
या दोन्ही फोटोंना ‘Was It AI’ या AI डिटेक्शन टूलच्या साहाय्याने पडताळले असता हे फोटो मोठ्या प्रमाणात AI-Generated असल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष
के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या नवजात मुलीसोबतचा हा फोटो खोटा आहे. हा AI-Generated फोटो असून, चुकीच्या माहितीच्या आधारे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.
(PTI या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.