
Created By : Boom Live
Translated By: Sakal Digital Team
होळीच्या निमित्ताने स्क्रॅच कूपन कार्डद्वारे कॅशबॅक देण्याच्या नावाखाली अनेक फसव्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये बनावट वेबसाइट्सच्या लिंक्स आहेत ज्या विविध सरकारी योजना आणि उत्सवांच्या नावाखाली फोनपे या पेमेंट अॅपवरून कॅशबॅक देण्याचा दावा करतात. पण खरं तर त्यावर क्लिक केले तर तुमच्याच अकाउंटमधून पैसे कापले जातात. प्रत्यक्षात, कॅशबॅक देण्याऐवजी, या स्कॅम लिंक्स पेमेंट रिक्वेस्टद्वारे वापरकर्त्याच्या खात्यातून पैसे काढतात.