

Created By : PTI
Translated By: Sakal Digital Team
Fact Check Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 24 सेकंदांच्या या क्लिपमध्ये ते भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर कोणावर तरी कारवाई करण्याबाबत बोलत आहेत. युजर्सचा दावा आहे की, राहुल गांधींचे हे विधान हिंदूंच्या विरोधात होते आणि ते भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर हिंदूंची स्थिती बांगलादेशपेक्षा वाईट बनवण्याबद्दल बोलत होते.