
Created By : factly
Translated By: Sakal Digital Team
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' हा ऐतिहासिक सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या संदर्भात, सोशल मीडियावर (येथे,येथे आणि येथे) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काळ्या पोशाखात असलेले लोक रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनावर हल्ला करताना दिसत आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील मुस्लिम समुदायाने 'छावा' चित्रपटाच्या रिलीजच्या निषेधार्थ हिंसाचार केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.