Created By :Vishvas News
Translated and Edited By: Sakal Digital Team
मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील अरबी समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीला प्रवाशांनी भरलेली एक बोट धडकून अपघात झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी घडली. अपघातानंतर प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात कोसळली. नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटना घडून दोन आठवडे झाले तरीही सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ असल्याचे सांगत एक भलताच व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बोट बुडताना दिसत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडिओ मुंबईचा आहे, जिथे बोट बुडाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
विश्वास न्यूजने केलेल्या चौकशीत हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ हा मध्य आफ्रिकेतील कांगो या देशातील आहे.