Created By: NewsMeter
Translated by: Sakal Digital Team
उत्तरप्रदेश पोलिसांनी 24 नोव्हेंबरला संभलमधील हिंसक घटनेत घटनास्थळावर पाकिस्तानात तयार करण्यात आलेले काडतूस मिळाल्याची माहिती दिली आहे. संभलमध्ये पाच मुस्लिमांची हत्या करण्यात आली होती. संभलचे पोलिस अधिक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी मृतदेह मिळाले तिथे जवळच एका नाल्यातून 6 काडतूस जप्त करण्यात आले आहेत. त्यातील पाच काडतूस फायर केले होते. आणि एक मिसफायर होते. फायर केलेल्या काडतुसांमधील एका काडतुसावर 'POF 9mm 68-26' असे लिहिले होते, जे हे दर्शविते की ते काडतूस पाकिस्तान आयुध निर्माणी (POF)मध्ये बनविले आहे.
उत्तरप्रदेशातील संभलमध्ये 500 वर्षे जुनी शाही जामा मशीदीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला होता.