Fact Checkesakal
व्हायरल-सत्य
Fact Check : जम्मू-काश्मीरमधील भ्याड हल्ल्यातील क्रूर दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर? काय आहे सत्य
Pahalgam Terror Attack : बैसरन टेकडी भागात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी दुपारी अडीच वाजता 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन टेकडी भागात झालेल्या हल्ल्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दल आता हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान पर्यटकांच्या गटावर गोळीबार करणाऱ्या एका दहशतवाद्याचा पहिल्या फोटो समोर आल्याचा दावा केला जात आहे. त्याने हातात बंदूक धरलेली दिसत आहे. मात्र फॅक्ट चेकिंगमध्ये हा फोटो पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा नसल्याचे समोर आले आहे.