Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

मशरूम खाल्ल्यानं प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी असतो असे एका संशोधनामध्ये (रिसर्च) सिद्ध झाल्याचा दावा केला जात आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये हा रिसर्च प्रकाशित कऱण्यात आला आहे. 

मशरूम खाल्ल्यानं प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी असतो असे एका संशोधनामध्ये (रिसर्च) सिद्ध झाल्याचा दावा केला जात आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये हा रिसर्च प्रकाशित कऱण्यात आला आहे. 

या रिसर्चमध्ये 40 ते 79 वयोगटातील 36000 पुरूषांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी मशरूम खाल्ल्याने मध्य वयाच्या आणि वयोवृद्धांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो असं स्पष्ट झाले आहे.

रिसर्च करताना आठवड्यातून एकदा मशरूम खाणारे आणि आठवड्यातून दोनदा खाणाऱ्यांची तुलना करण्यात आली. आठवड्यातून दोनदा मशरूम खाल्ल्याने 8 टक्के प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी आढळला. तर आठवड्यातून तीनदा मशरूम खाणाऱ्यांमध्ये 17 टक्के प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी आढळला.

-------------------------------------------------------------
Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)
-------------------------------------------------------------

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे 
- ऍडव्हान्स स्टेजमध्ये लघवीत अडथळा येणे
- लघवीची गती कमी होणे
- वीर्यातून रक्त येणे 
- हाडे दुखणे

खरंच रोखता येतो
- सर्वच भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट किंवा व्हिटॅमिन असतात
- मशरूममध्ये कॅन्सरला रोखण्याची शक्ती आहे
- मशरूममध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने कॅन्सरचा ट्युमर होत नाही
- कॅन्सरचा ट्युमर झाल्यास मशरुममुळे रोखण्यास मदत होते

सर्वच भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट किंवा व्हिटॅमिन असतात, ते मुबलक प्रमाणात घेतले तर कुठल्याही प्रकारचा कॅन्सर टाळता येतो...त्यामुळं आमच्या पडताळणीत मशरूम खाल्ल्याने कॅन्सर टाळता येत असल्याचा दावा सत्य ठरला.
-------------------------------------------------------------
Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)
-------------------------------------------------------------

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reducing the risk of prostate cancer by eating mushrooms