Fact Check: हरियाणामध्ये भाजप उमेदवारावर दगडफेक झाली नाही! व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना

Haryana Sirsa Bjp Candidate Video: हरियाणातील सिरसा येथे भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा दावा करणारा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Fact Check: Haryana Sirsa Bjp Candidate Video
Fact Check: Haryana Sirsa Bjp Candidate VideoEsakal

Created By: न्युजचेकर

Translated By : सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एका वाहनावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हरियाणातील सिरसा येथे लोकांनी भाजप उमेदवार अशोक तंवर यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा दावा करत सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, न्युजचेकर या वृत्तसंस्थेने केलेल्या तपासणी(fact Check) मध्ये असे आढळले की, हा व्हिडिओ सुमारे 3 वर्षे जुना आहे आणि 2020-2021 मधील शेतकरी आंदोलनाचा आहे. हरियाणा विधानसभेचे उपसभापती रणबीर गंगवा यांच्या ताफ्यावर सिरसा येथे दगडफेक करण्यात आल्याचा तो मूळ व्हिडिओ आहे.

तथ्य तपासणीत काय आढळले? (Fact Check/ Verification)

'न्यूजचेकर'ने व्हिडिओच्या की फ्रेमच्या मदतीने प्रथम Google वर शोधले आणि पहारेदार भारत (Pahredar Bharat) नावाच्या पोर्टलवरून 11 जुलै 2021 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ त्यांना सापडला. या व्हिडिओमध्ये तेच लोक उपस्थित होते, जे व्हायरल व्हिडिओमध्येही आहे.

सुमारे 7 मिनिटे 41 सेकंदांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागात व्हायरल झालेला व्हिडिओ 'न्यूजचेकर'ला आढळला. व्हिडिओसोबतच्या वर्णनात सिरसा येथील शेतकऱ्यांनी हरियाणाचे उपसभापती रणबीर गंगवा यांची गाडी फोडल्याचे सांगण्यात आले.

यानंतर, जेव्हा 'न्यूजचेकर'ने संबंधित कीवर्डच्या मदतीने Google वर शोधले तेव्हा त्यांना 11 जुलै 2021 रोजी ETV भारत वेबसाइटवर प्रकाशित झालेला अहवाल सापडला. या अहवालात, व्हायरल व्हिडिओशी संबंधित व्हिज्युअल फीचर इमेजच्या स्वरूपात उपलब्ध होते.

मूळ व्हिडिओ रणबीर गंगवा त्यांच्या कार्यक्रमाचा

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै 2021 रोजी सिरसा येथील चौधरी देवीलाल विद्यापीठात भाजपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हरियाणा विधानसभा अध्यक्ष रणबीर गंगवा आणि इतर अनेक भाजप नेतेही सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर उपसभापती रणबीर गंगवा बाहेर आले तेव्हा त्यांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी तीन कृषी कायद्यांना विरोध करत थांबवले. यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या.

2021 साली 'आज तक' नेही प्रसिध्द केले होते वृत्त

तपासादरम्यान (Fact Check), 'न्यूजचेकर'ला 12 जुलै 2021 रोजी Aaj Tak च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला अहवाल देखील सापडला. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या रणबीर गंगवा यांना शेतकऱ्यांनी विरोध केला आणि यादरम्यान त्यांच्या गाडीलाही लक्ष्य करण्यात आल्याचेही या वृत्तात सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, त्यामुळे शेतकरीही जखमी झाले होते.

2021 मध्ये 'न्यूज 18 हिंदी' नेही प्रसिध्द केले होते वृत्त

या व्यतिरिक्त, 'न्यूजचेकर'ला 13 जुलै 2021 रोजी न्यूज 18 हिंदी वेबसाइटवर प्रकाशित केलेला अहवाल देखील मिळाला. या वृत्तात सिरसा पोलिसांनी या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात सुमारे 100 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले होते.

2021 मध्ये दैनिक भास्करनेही प्रसिध्द केले होते वृत्त

यानंतर, 'न्यूजचेकर'ने अशोक तन्वर यांच्या विरोधी दाव्याचीही चौकशी केली आणि 6 एप्रिल 2021 रोजी दैनिक भास्करच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेला अहवाल मिळाला. गेल्या शनिवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भाजपचे उमेदवार अशोक तंवर यांना पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपला कार्यक्रम रद्द करावा लागला, असे या वृत्तात म्हटले आहे.

निष्कर्ष (Conclusion)

'न्यूजचेकर'ला तपासात आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ अलीकडचा नसून 2021मध्ये उपसभापती रणबीर गंगवा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचा आहे.

'न्यूजचेकर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

-------------

Fact Check: Haryana Sirsa Bjp Candidate Video
Fact Check: महिला आरक्षणामुळे कंगनाला भाजपचे तिकीट मिळाल्याचा दावा खोटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com