Fact Check : न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींची थट्टा केली नाही! व्हायरल होत असलेल्या कथित स्क्रीनशॉटचं सत्य समोर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक पक्षातील लोक एकमेकांवर टीका करत आहेत. अशात मोठ्या प्रमाणात खोटे तसेच एडिट केलेले अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Fact Check on The New York Times alleged Cartoon of PM Modi
Fact Check on The New York Times alleged Cartoon of PM ModieSakal

Reported By : लॉजिकली फॅक्ट्स

Translated By : सकाळ डिजिटल टीम

Fact Check on The New York Times alleged Cartoon of PM Modi :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक पक्षातील लोक एकमेकांवर टीका करत आहेत. अशात मोठ्या प्रमाणात खोटे तसेच एडिट केलेले अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काय आहे दावा?

सोशल मीडियावर 'दि न्यूयॉर्क टाईम्स' (The New York Times) या अमेरिकेतील वृत्तपत्राचा कथित स्क्रीनशॉट शेअर केला जातो आहे. या वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींची थट्टा केल्याचं म्हणत हा फोटो शेअर केला जातोय. या कथित स्क्रीनशॉटमध्ये तशा प्रकारचं कार्टूनही दिसत आहे. इलेक्टोरल बाँड्सच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांवर टीका केल्याचं यात दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट

या पोस्टला तब्बल 1,21,000 हून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. या पोस्टचं अर्काईव्ह व्हर्जन आणि यासंबंधित इतर एक्स पोस्ट इथे पाहता येऊ शकतील. मात्र, हा दावा आणि व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट देखील फेक असल्याचं फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे.

Fact Check on The New York Times alleged Cartoon of PM Modi
Fact Check: काँग्रेसच्या रॅलीतील झेंडे पाकिस्तानचे नाहीत, खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहेत जुने व्हिडिओ

न्यूयॉर्क टाईम्सने खरंच पंतप्रधानांचं कार्टून प्रसिद्ध केलं?

लॉजिकली फॅक्ट्स वेबसाईटने असे कित्येक मुद्दे समोर आणले आहेत, ज्यामुळे हा स्क्रीनशॉट खोटा असल्याचं सिद्ध होत आहे. पहिलीच गोष्ट म्हणजे, या स्क्रीनशॉटमध्ये पेपरची तारीख 15 मार्च 2024 अशी आहे. या दिवशीच्या न्यूयॉर्क टाईम्स पेपरचं फ्रंट पेज हे वेगळं असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

न्यूयॉर्क टाईम्सचं खरं फ्रंट पेज
न्यूयॉर्क टाईम्सचं खरं फ्रंट पेज

यासोबतच, दि न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर देखील व्हायरल दाव्याप्रमाणे कोणतंही आर्टिकल किंवा फोटो मिळाला नाही. म्हणजेच व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट फेक आहे.

यासोबतच, व्हायरल फोटोला नीट पाहिल्यास त्यामध्ये 'satire edition' (सटायर एडिशन) आणि 'Reported by Educated Billa' असं लिहिलेलं दिसत आहे.

व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दिसणारे वेगळे शब्द
व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दिसणारे वेगळे शब्द

यात खालच्या बाजूला एक वेगळीच हिंदी बातमी देखील दिली आहे. न्यूयॉर्क टाईम्स हे इंग्रजी वृत्तपत्र आहे, ज्यात अशी बातमी दिसण्याची शक्यता नाही.

या स्क्रीनशॉटमध्ये सगळीकडे Modiji ऐवजी Moiji असं लिहिलेलं दिसत आहे. तसंच पेपरचा फाँट, मांडणी अशा कित्येक गोष्टी पाहिल्यानंतरच हा फोटो खोटा असल्याचं समजतंय.

Fact Check on The New York Times alleged Cartoon of PM Modi
Fact Check: "पुढील आयुष्यात मुस्लिम म्हणून जन्म घ्यायचा आहे," कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल

हा फोटो एड्युकेटेड बिल्ला या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर करण्यात आला होता. फोटोमध्ये देखील त्याचं नाव दिलं आहे. त्यामुळे 'लॉजिकली फॅक्ट्स'च्या रिपोर्टरने या एडिटरशी संपर्क साधला. त्यानंतर हा फोटो खरंतर सटायर, म्हणजेच उपहास असल्याचं एडिटरने स्वतःच मान्य केलं.

एड्युकेटेड बिल्ला अकाउंटच्या एक्स पोस्टचा स्क्रीनशॉट
एड्युकेटेड बिल्ला अकाउंटच्या एक्स पोस्टचा स्क्रीनशॉट

निर्णय -

एकूणच, दि न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधानांची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र प्रसिद्ध केलेलं नाही हे स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा फोटो खोटा असून, तो पुढे शेअर करु नये.

लॉजिकली फॅक्ट्स या वेबसाईटने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com