esakal | Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Satya Video Crocodile was found in the bathroom of the house

रात्रीची वेळ होती. सगळेजण झोपले होते. त्याचवेळी बाथरुममधून कसालातरी आवाज येत होता. आवाज कसला येतोय हे पाहण्यासाठी घरमालकानं बाथरुमचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमिनीच सरकली. बाथरुममध्ये भलीमोठी मगर तोंड उघडून होती.

Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रात्रीची वेळ होती. सगळेजण झोपले होते. त्याचवेळी बाथरुममधून कसालातरी आवाज येत होता. आवाज कसला येतोय हे पाहण्यासाठी घरमालकानं बाथरुमचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमिनीच सरकली. बाथरुममध्ये भलीमोठी मगर तोंड उघडून होती. आपल्या घरात मगर कशी काय आली, या भीतीनं आता काय करावं हेच त्याला कळेना. अखेर घरमालकानं रेस्क्यू टीमला बोलावलं. मग काय झालं पाहा. ही भली मोठी मगर पकडण्याचा प्रयत्न केला. काहीवेळानंतर या मगरीला पकडण्यात यश आलं. पण, साडे चार फुटांची मगर घरात आढळल्यानं घरमालक महेंद्र पढियार यांची झोपच उडाली.
व्हायरल सत्य

अथक प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश आलं. रात्री अचानक आवाज आल्यानं बाथरूममध्ये मांजर असावी असं त्यांना वाटलं. पण, बाथरूमचा दरवाजा उघडून पाहिल्यावर भलीमोठी मगर दिसली. रात्री खूप अंधार असल्यानं मगरीला पकडणं शक्य नव्हतं. त्यामुळं रेस्क्यू टीमला पाचारण करून मगरीला ताब्यात घेतलं.

हा सगळा प्रकार गुजरातच्या वडोदरामध्ये पाहायला मिळालाय. ही मगर विश्वमित्री नदीतून आली असावी असं बोललं जातंय. पण, भलीमोठी मगर घरात शिरल्यानं कुणावरही हल्ला केला असता. पण, वेळीच मगरीला पकडल्यानं मोठा अनर्थ टळला. आता या मगरीला पकडून जंगलात सोडून दिलंय. मात्र, मगरी वस्तीत शिरू लागल्यानं दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.

**************************************************************

Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video)

Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video)

Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video)

Viral Satya : नारळ उतरवण्याची माकडाला ट्रेनिंग (Video)

Viral Satya : एलआयसीमधले पैसे बुडणार? (Video)

Viral Satya : पुण्यात रात्रीच्या अंधारात मुलीला भुतानं झपाटलं? (Video) 

Viral Satya : डोक्यावर पाय ठेवून भक्तांना आशीर्वाद (Video)

Viral Satya : खांद्यावर बसलं माकड, पोलिसाच्या डोक्याला मसाज (Video)