Viral Satya : डोक्यावर पाय ठेवून भक्तांना आशीर्वाद (Video)

Odisha temple priest places foot on devotees heads to bless
Odisha temple priest places foot on devotees heads to bless

पुजारी आपल्या भक्तांना कशा आशीर्वाद देतोय बघा. चक्क डोक्यावर पाय ठेवून हा पुजारी आपल्या भक्तांना आशीर्वाद देतोय. असला कसला हा पुजारी...? पायानं कसला हा आशीर्वाद देतोय. कुणाला आपला पाय लागला तरी आपण त्याच्या पाया पडतोय. पण, हा पुजारी मात्र, भक्तांना पायानंच आशीर्वाद देतोय. अजब पुजाऱ्याचा हा गजब आशीर्वाद पाहून भक्तही हैराण झालेयत. भक्त ते, आपल्या पुजाऱ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या या भक्तांनी पायाचा आशीर्वाद गोड मानून घेतलाय.

हा सगळा प्रकार ओडिशातील खोर्धामधल्या बनपूर भागात पाहायला मिळालाय. बनपूर गावातल्या मंदिरात हे भक्त दर्शनासाठी आले होते. त्यावेळी भक्तांना एका रांगेत बसवून या पुजाऱ्यानं भक्तांना आशीर्वाद दिला. भक्तांच्या डोक्यावर आणि पाठीवर पाय ठेवून हा पुजारी आशीर्वाद देतोय. अशा प्रकारच्या आघोरी आशीर्वादामुळे सोशल मीडियावर टीका होतेय.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे समोर बसलेले भक्तही अगदी तन्मयतेने या पुजाऱ्याच्या पाया पडतायत. फक्त तरुणच नाहीयेत तर वयोवृद्धही आहेत. त्यामुळं या पुजाऱ्याचा कृत्याचा विरोध केला जातोय.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com