Viral Satya : नारळ उतरवण्याची माकडाला ट्रेनिंग (Video)

Coconut removal training given to Monkey
Coconut removal training given to Monkey

नारळ झाडावरून खाली उतवण्यासाठी आता कारागीराची गरज नाही. कारण, आता माकडही नारळ खाली उतरवून देऊ शकतो. होय, हे आता सहज शक्य आहे. नारळाची झाडं लावली, पण नारळ काढण्यासाठी कारागीर मिळत नसल्यानं या कुटुंबानं चक्क युक्तीच केली. झाडावर चढणाऱ्या माकडालाच नारळ उतरण्याचं ट्रेनिंग दिलं.

माकड सहज नारळाच्या झाडावर चढत असल्यानं त्याला फक्त ट्रेनिंग दिली तर माकड नारळ काढू शकतो हे यांना कळालं होतं. मग काय या महिलेनं माकडालाच झाडावर चढून कसे नारळ उतरवायचे याचं ट्रेनिंग दिलं. माकडही हौसी असल्यानं मालकीणीचं सगळं ऐकत होता. घरातील सदस्याप्रमाणंच याची सगळेजण काळजी घेऊ लागले. आता पाहा, ही महिला या माकडाला नारळ कसे काढायचे याचं ट्रेनिंग देतेय.

झाडावरील नारळ कसा तोडायचा हे या माकडाला शिकवतेय. नारळ गोल गोल फिरवल्यानंतर तो सहज तोडू शकतो हे माकडला शिकवल्याप्रमाणं माकड झाडावर चढून नारळ तोडू लागला. आता या माकडाकडे पाहा, हा नारळाच्या झाडावर चढून सहज नारळ तोडतोय. अशा प्रकारे या माकडानं झाडावर तयार झालेले नारळ उतरवलेयत. हा माकड एका कारागिराचं काम करत असल्यानं पैसे आणि मेहनतही वाचलीय. आता नारळाच्या उंच झाडावरून नारळ काढण्याचं मोठं काम हलकं झालंय. हा सगळा प्रकार थायलंडमध्ये पाहायला मिळालाय. अशाच प्रकारे माकडांना नारळ काढण्याचं ट्रेनिंग दिलं तर मेहनत आणि कारागिराचे पैसेही वाचतील. त्यामुळं तुम्हीही असा प्रयोग करून बघा.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com