Viral Satya : मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा जपून (Video) 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 November 2019

बनावट लिंक असेल आणि तुम्ही लिंक उघडून पाहिल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. सायबर गुन्हेगार पैशांचं आमिष दाखवून लोकांना जाळ्यात ओढतायत आणि लिंकच्या माध्यमातून गंडा घालतायत.

आपल्या मोबाईलवर अनेक मेसेज येतात. तुम्हाला लॉटरी लागलीय. तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत. टॅक्स रिफंड झालाय अशा प्रकारे मेसेज येतो आणि त्याखाली एक लिंकही असते. पण, बनावट लिंक असेल आणि तुम्ही लिंक उघडून पाहिल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. सायबर गुन्हेगार पैशांचं आमिष दाखवून लोकांना जाळ्यात ओढतायत आणि लिंकच्या माध्यमातून गंडा घालतायत.

मोबाईलवर आलेली लिंक उघडून पाहिल्यानं अनेकांना त्याचा फटका बसलाय. कित्येक जणांच्या खात्यातून पैसेही काढले गेलेयत. त्यामुळं अशा बनावट लिंक आल्या तर काय काळजी घ्यायला हवी हे आम्ही सायबर एक्सपर्टकडून जाणून घेतलं.

काय काळजी घ्यावी ?
- मोबाईलवर आलेल्या लिंक उघडून पाहू नका
- लिंक खरी आहे की खोटी याची खात्री करा
- कोणत्याही लिंकवर क्लिक करून पैसे भरू नका
- मेसेजवर शंका आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा
- बनावट वेबसाईटवर सायबर गुन्हेगार फसवणूक करतात

त्यामुळं तुमच्या मोबाईलवर लिंक उघडून पाहा असा मेसेज आला तर उघडून पाहू नका. त्या लिंकची आधी खात्री करा मगच उघडून पाहा. नाहीतर लिंक सायबर गुन्हेगारांनी पाठवली असेल तर नुकसान होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही अशा लिंकपासून सावधगिरी बाळगा.

**************************************************************

Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video)

Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video)

Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video)

Viral Satya : नारळ उतरवण्याची माकडाला ट्रेनिंग (Video)

Viral Satya : एलआयसीमधले पैसे बुडणार? (Video)

Viral Satya : पुण्यात रात्रीच्या अंधारात मुलीला भुतानं झपाटलं? (Video) 

Viral Satya : डोक्यावर पाय ठेवून भक्तांना आशीर्वाद (Video)

Viral Satya : खांद्यावर बसलं माकड, पोलिसाच्या डोक्याला मसाज (Video)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya Video fake link on the mobile