

Created By :Vishvas News
Translated By: Sakal Digital Team
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या कुवेत दौऱ्याच्या संदर्भात त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की या भेटीदरम्यान त्यांनी कुवेतच्या महाराणीची भेट घेतली होती, जी तिच्या आपल्या पोशाखावरुन कोणत्याही मुस्लिम देशाच्या महाराणी सारखी दिसत नाही.
विश्वास न्यूजने तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेला फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्याशी संबंधित आहे, पण त्यांना भेटणारी महिला शेखा अल-सबाह आहे, ती तेथील लोकप्रिय योग प्रशिक्षक आहे. शेखा अल-सबाह या कुवेतचा पहिला परवानाधारक योग स्टुडिओ असलेल्या दरात्माच्या संस्थापक आहेत.