Viral Video
Viral Video

Viral Video : मॅडमला काळ्या पोरांना शिकवावं वाटत नाही, सर भजन शिकवतात; ZPच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलांनी शाळेतील शिक्षकांच्या तक्रारींचा पाढाचं वाचला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) गावातील हे विद्यार्थी आहेत.

शाळेत शिक्षक दुपारी येतात तो पर्यंत विद्यार्थी शाळेत खाली-पिली बसून असतात. काळ्या रंगाच्या मुलांना शिकवायला शिक्षकांना आवडत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. फक्त तक्रार नाही तर त्यांनी याविरोधात मोर्चा काढला. 

मास्तर विद्यार्थ्यांना सकाळी लवकर १० वाजता शाळेत यायला सांगतात. मात्र ते स्वत: २ वाजता शाळेत येतात. आम्हाला एकही मास्तर नको फक्त डांगे मॅडम पाहीजेत. तसेच मॅडम म्हणतात काळ्या पोरांना शिकवावे वाटत नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. 

Viral Video
Priya Berde: अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश, राष्ट्रवादीला रामराम

या विद्यार्थ्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विद्यार्थ्यांनी आपले गऱ्हाने मांडले आहे. 

bramhapuri.city या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. 

"विद्यार्थ्यांची शिकण्याची मानसिकता हे अशा शिक्षकांच्या वागण्यामुळेच खराब होत आहे. जि.प शाळेंचे जे हाल आहेत ते तेथील शिक्षकांमुळेच झाले आहेत. हे असं बोलणं असते का विद्यार्थ्यांशी (फुकटाचा खाले येता, काळ्या पोरायले शिकवूसा नाही वाटत) हे काय शिकवणार हे मुलांना. पगार फुकटाचा घेतायत जरा काहीतर वाटू द्या. उद्या हिच मुले तुमचा आदर्श घेउन पुढे जाणार आहेत," असे अनुप रामटेके यांनी म्हटले आहे. 

Viral Video
'Rakhi Sawant माझं नाव उगाच वादात ओढू नकोस',आदिलची गर्लफ्रेंड तनु चंदेलनं शॉकिंग खुलासा करत उडवून दिली खळबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com