#SaathChal संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्यासाठी लोणीत सर्व यंत्रणा सज्ज

जनार्दन दांडगे
Saturday, 7 July 2018

लोणी काळभोर : संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग व पोलिस प्रशासन अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. 

लोणी काळभोर : संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग व पोलिस प्रशासन अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. 

पुणे शहरातील मुक्काम आटोपून ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी (ता. ०९) लोणी काळभोर येथे मुक्कामी येणार आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतीने गावातील मुख्य चौक, रस्ते, बाजारतळ, पालखीतळ, जिल्हा परिषद शाळांचा परिसर, उद्यान, स्मशानभूमी परिसर व विठ्ठल मंदिर परिसराची स्वच्छता केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांसाठी स्मशानभूमी परिसरात तात्पुरती फिरती शौचालये उभारली असून वारकऱ्यांना पिण्याचे व शौचालयांसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन केले.

रस्त्यावरील पथदिव्यांची दुरुस्ती करून डासांच्या उपद्रव थांबविण्यासाठी उघड्यावर साठलेल्या पाण्याचा योग्य निचरा करून देण्यात आला आहे. दरम्यान पालखी सोहळ्याच्या काळात गावातील सुरक्षेसाठी असेलेली सीसीटीव्ही व ध्वनीक्षेपक यंत्रणा कंट्रोल रूम मार्फत चालविली जाणार असल्याची माहिती सरपंच वंदना काळभोर यांनी दिली. पालखी आढावा बैठकीसाठी  मंडलाधिकारी चंद्रशेखर दगडे, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष प्रशांत काळभोर, गावकामगार तलाठी जी. जे. शेवाळे, ग्रामविकास अधिकारी जे. एच. बोरावणे उपस्थित होते. दरम्यान कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एंजल हायस्कूल, इंदिरानगर व ग्रामपंचायत कार्यालयाजवळील शुद्ध पाणी पुरवठा (आर. ओ. मशिन) प्रकल्पातून वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी मोफत पुरविण्यात येणार असल्याचे सरपंच गौरी गायकवाड यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावांच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात आली असून सर्व ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. परिसरातील सर्व हॉटेलची तपासणी, वारकऱ्यांच्या दिंडीसाठी टँकर भरणा केंद्र, जिल्हा परिषदेच्या ४ रुग्णवाहिका, आरोग्य सेविका, पाच ठिकाणांवर तात्पुरती मदत केंद्रे, जलशुद्धीकरणासाठी टीसीएलचा वापर व पुरेशी औषधे अशी सर्व उपाययोजना करण्यात आली आहे. याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे ७० कर्मचाऱ्यांची सोय केली असल्याचे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी सांगितले. 

लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या वतीने पालखी सोहळ्याच्या काळात कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन (ता. हवेली) दरम्यान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, स्वयंसेवक, एन. एस. एस., ग्रीन फिल्ड व पोलिस मित्र संघटना सज्ज झाली असल्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले.

पालखी सोहळ्यादरम्यान अत्यावश्‍यक सेवांसाठी उपलब्ध यंत्रणा व संपर्क क्रमांक - लोणी काळभोर पोलिस ठाणे - ०२० २६९१३२६०
पोलीस निरीक्षक - क्रांतीकुमार पाटील - ९९२३०७११००
प्राथमिक आरोग्य केंद्र - वैद्यकीय अधिकारी - डॉ. दगडू जाधव - ९८२२८९५३४५
पंचायत समिती सदस्य - युगंधर काळभोर - ९९७५९०७७७७, सरपंच - वंदना काळभोर - ९८६०५०४१४१, उपसरपंच - योगेश काळभोर - ९७६४१७७७९९. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all system are redy for sant tukaram maharaj palkhi in loni