रिंगण सोहळ्याने वातावरण विठ्ठलमय

संत तुकाराम महाराज पालखी: वरुणराजाच्या हजेरीने उत्साह दुणावला
Ashadi wari 2022 Sant Tukaram Maharaj Palkhi rigan sohla rain at indapur
Ashadi wari 2022 Sant Tukaram Maharaj Palkhi rigan sohla rain at indapur sakal

इंदापूर : उन्हाची तिरीप अन् ढगाळ वातावरण... प्रदक्षिणा घालताना घामाघूम झालेले वारकरी... अश्वांची मनमोहक दौड... टाळकरी व मृदंगाचा गजर... पुंडलिक वरदेचा जयघोष... त्यात वरुणराजाच्या हजेरीने उपस्थितांचा उत्साह दुणावला. सुमारे दीड तासांहून अधिक वेळ संत तुकाराम महाराज पालखीचा रिंगण सोहळा रंगला. अवघी इंदापूरनगरी विठ्ठलमय वातावरणात रंगून गेली. सकाळी निमगाव केतकी येथे ग्रामस्थांनी अभिषेक, पूजा केली. त्यानंतर पालखी सोहळा सहा वाजता इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. तरंगवाडी कॅनॉल व गोकुळीचा ओढा येथे विसावा घेतला. पावणे बारा वाजता पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी पोचला. रिंगणाच्या ठिकाणी साडेअकरा वाजता सोहळा आला. अश्व, २७ दिंड्या, संत तुकाराम महाराज पालखी रथ, त्यामागील दिंड्या पोचल्या.

त्यानंतर रिंगणाच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालून पालखी मध्यभागी ठेवली. रिंगणात संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे, सोहळाप्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विश्वस्त बाळासाहेब मोरे, संजय मोरे, भानुदास मोरे, विशाल मोरे, अजित मोरे, माजी अध्यक्ष बापूसाहेब मोरे, सुरेश मोरे, माजी विश्वस्त प्रल्हाद मोरे, पंढरीनाथ मोरे, विश्वजित मोरे, रामभाऊ मोरे उपस्थित होते. चोपदार नामदेव गिराम देशमुख, चोपदार कानसूरकर यांनी रिंगण लावले. रिंगणावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते. पताकाधारी वैष्णव, विणेकरी, तुळस-पाण्याचे हांडे घेतलेल्या महिला आणि टाळकरी व मृदंग यांनी दोन-दोन प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर बाभूळकरांचा मानाचा देवाचा अश्व व स्वाराचा मोहिते पाटील यांच्या अश्वाने दौड सुरू केली. त्यांनी देखील दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. दोन्ही अश्वांनी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले. अश्वांच्या टापूखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

चोपदारांच्या सूचनेनुसार पालखीच्या सभोवती टाळकरी व मृदंगवादक यांच्यात उडीचा कार्यक्रमात रंगला. मानाचा अभंग झाला. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची आरती झाली. त्यानंतर सोहळा नारायणदास विद्यालयात पोचला. दुपारी समाज आरतीनंतर सोहळा इंदापुरात दीड दिवसासाठी विसावला.

‘‘कोरोनामुळे दोन वर्षे वारी झाली नाही. देव दर्शन न झाल्याने दुःख वाटले. आता वारी सुरू झाल्याने आत्मानंद घेतोय. वारीचे दिवस खूप सुखाचे असतात. आम्हाला घरी गेल्यावर काही दिवस करमतही नाही.

- शालन सावंत, अरण, जि. सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com