सामुहिक शक्तीचा आषाढी वारी आविष्कार

चैतन्य वारी : डॉ. प्रदीप कुरुलकर
Chaitanya Wari Dr Pradeep Kurulkar
Chaitanya Wari Dr Pradeep Kurulkar

डॉ. प्रदीप कुरुलकर, संचालक, संशोधन आणि विकास आस्थापन (आर अँड डीई), डीआरडीओ.

पुण्यामध्ये ‘डीआरडीओ’मध्ये काम करीत असताना गेल्या अनेक वर्षांपासून माउलींचा रथ डागडुजीसाठी येतो. खूप मनोभावे सर्व कामगार ती सेवा म्हणून करतो. तसेच पुण्याला जाताना पालखी ‘डीआरडीओ’च्या प्रवेशद्वारावर घटकाभर थांबते. तेव्हा आम्ही स्वागत करतो. वारकऱ्यांना नाश्ता, तसेच त्यांना काही सुविधा उपलब्ध करून देतो. त्यामध्ये ‘डीआरडीओ’मधील सुरक्षारक्षकापासून ते माझ्यापर्यंत सर्वजण सहभागी होतो. आत्मिक आनंद अनुभवतो. माझे गाव पंढरपूरजवळ आहे. माझे आजोबा, वडील पंढरपुरात राहत होतो. त्यामुळे विठ्ठलाशी आणि वारकरी संप्रदायाशी नाते आहे.

कोणतेही बंधन नसताना लाखो वारकरी आषाढी वारीत सहभागी होतात. त्यांना कोणतेही निमंत्रण नसताना माउलींवर असलेल्या निष्ठेमुळे हे सारे वारीत एकवटतात. अठरा-वीस दिवस प्रेमभावाने राहतात. वारीत शेतकरी, व्यापारीसह सर्व क्षेत्रातील भाविक सहभागी होतात. केवळ संतांवर, विठ्ठलावर विश्वास कारणीभूत असतो. वारी ही एक सकारात्मक समुहशक्तीचे उत्तम उदाहरण आहे. जे या पृथ्वीतळावर कोठेही बघायला मिळत नाही. कोणेताही स्वार्थ नसताना एकाच विठ्ठलभक्तीसाठी एकाच रस्त्याने कुटुंबाप्रमाणे वाटचाल करतात. हे कुठेही पाहायला मिळत नाही. कोण किती शिकला आहे, कोण किती श्रीमंत आहे, कोणत्या जातीचा आहे, हे न पाहता गुण्यागोविदांने एका कुटुंबासारखे राहतात. वारी ही एक सामुहिक विश्वास असलेली कृती आहे. ती कुठेही बघायला मिळत नाही. सर्वांचे ध्येय एकच असते, विठ्ठलदर्शन.

आपली वारी पूर्ण करणे. त्यातही सर्वांना विठ्ठलाचे दर्शन होत नाही. त्यामुळे आषाढी एकादशीला कळस दर्शन घेऊन हे वारकरी घरी परततात. म्हणजे इतके कष्ट करून चालत जात असले, तरी त्याच्या मंदिराचे दर्शन घेऊन वारकरी समाधान मानतात. पंढरीत एक विठ्ठल उभा आहे. त्याभोवती फिरणारे वारी ही आध्यात्मिक शक्ती आहे. सामाजिक समरसतेचे दर्शन वारीत दिसून येते. ऐशी वर्षांचा वारकरी छोट्या मुलांच्याही पाया पडतो. वारीत चालणारा वारकरी घरीही तसाच राहतो. म्हणजे वारकऱ्याच्या घरात कोणी पाहुणे आले, तर त्यांना तुम्ही जेवण केले का? असा प्रश्न करीत नाहीत तर जे घरात आहे, ते त्याला खाऊ घालतात. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांमध्ये वाटून खायचे संस्कार आषाढी वारीतच होतात.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ राबवीत असलेला निर्मलवारीचा उपक्रम आदर्शवत आहे. त्यांच्याकडून स्वच्छतेचे काम केले जाते. वारीत जाणीव ठेऊन कृती केली जाते. असे क्वचितच अन्यत्र पाहायला मिळते. त्यामुळे तरुणांनी एकदा तरी वारी अनुभवावी. स्वयंशिस्तीची शिकवण वारीतून मिळते. वारीत जगला जाणारा सामाजिक भाव हीच महाराष्ट्राची मूळ संस्कृती अधोरेखित करते. वारीतूनच समाज परिवर्तनाचे धडे मिळतात. कोरोनाकाळात वारकऱ्यांनी सामाजिक बंधन स्वीकारली. दोन वर्ष पायी वारी केली नाही. त्यांच्यातील संयमच बरेच काही शिकवून जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com