अखंड वीज... वाहतुकीचेही नियोजन!

रमेश धायगुडे 
Thursday, 22 June 2017

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पारगाव-खंडाळा आगाराकडून जादा ५५ ते ६० बस मागवून घेतल्या आहेत. लोणंद शहरात तीन ठिकाणी तात्पुरती बस स्थानके उभारून, कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक करून प्रवासी वाहतुकीची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पालखी काळात वीजपुरवठा अखंडपणे सुरू राहावा यासाठी लोणंद विभागाकडूनही खबरदारी घेतली जात आहे. 

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पारगाव-खंडाळा आगाराकडून जादा ५५ ते ६० बस मागवून घेतल्या आहेत. लोणंद शहरात तीन ठिकाणी तात्पुरती बस स्थानके उभारून, कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक करून प्रवासी वाहतुकीची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पालखी काळात वीजपुरवठा अखंडपणे सुरू राहावा यासाठी लोणंद विभागाकडूनही खबरदारी घेतली जात आहे. 

श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. २४) दीड दिवसांच्या मुक्कामासाठी येथे अगमन होत आहे. त्या पाश्वभूमीवर सर्वच यंत्रणांकडून पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. पारगाव-खंडाळा आगाराच्या वतीने ५५ ते ६० ज्यादा गाड्यांचे नियोजन केले आहे. लोणंदमधील बस स्थानकांसह येथे लोणंद-खंडाळा रस्त्यावर बिरोबावस्ती, लोणंद-सातारा रस्त्यावर तापडिया बिल्डिंग, लोणंद-शिरवळ रस्त्यावर शिरवळ नाका येथे तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. १४ वाहतूक नियंत्रक व अन्य कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केली आहे. एक क्रेन, पाण्याचा टॅंकर, चार तपासणी पथके तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फिरते पथकही तैनात असेल. लोणंद बस स्थानकातील सर्व दिव्यांची दुरुस्ती करून स्थानकाच्या आवारात मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पारगाव-खंडाळा आगाराचे यात्रा व्यवस्थापक आर. एस. शिंगाडे, वाई आगाराच्या श्रीमती एस. एच. मुल्ला यांनी दिली.

वीज वितरण कंपनीकडूनही वीजपुरवठा अखंडपणे सुरू राहावा, यासाठी कामे सुरू आहेत. २२ केव्हीच्या वीज वाहिन्यांची दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. कापडगाव, मार्केट यार्ड व बाळासाहेब नगर येथे एलटी लाइनचे खांब नव्याने टाकले आहेत. ठिकठिकाणी लोंळकळणाऱ्या विजेच्या तारांची उंची वाढवली आहे. झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. फिरत्या शौचालयांना तात्पुरती वीज कनेक्‍शन दिली आहेत. सर्व ठिकाणच्या ट्रॉन्स्फॉर्मरची दुरुस्ती केली आहे. केबल टेपिंगचे कामही पूर्ण झाले आहे. पालखी तळावरील ट्रान्सफॉर्मर सुरू केला आहे. एकूण ३५ कर्मचारी, उपअभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांचे फिरते पथक नेमले आहे.

पालखी मुक्कामाच्या कालावधीत लोणंद परिसरात अखंडपणे वीजपुरवठा सुरू राहील. तीन दिवस लोडशेडिंग बंद ठेवण्यात येईल.
- योगेश बुरसे, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017 lonand