esakal | आळंदीत रस्त्याचे डांबरीकरण सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत रस्त्याचे डांबरीकरण सुरू 

आळंदीत रस्त्याचे डांबरीकरण सुरू 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळंदी -  प्रदक्षिणा रस्त्याच्या डांबरीकरणाला आज सुरवात करण्यात आली. दोन दिवसांत शहरातील पालखी मार्गाचे डांबरीकरण पूर्ण करणार असल्याची माहिती आळंदी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी दिली. 

प्रदक्षिणा रस्त्याच्या दुरुस्तीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. रस्त्याची आजवर अनेकदा डागडुजी करण्यात आली. मात्र, सर्वसामान्य आळंदीकरांकडून या कामाबाबत वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यामुळे पालिकेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता तयार केला जाणार आहे. शहरातील प्रदक्षिणा रस्त्याबरोबरच हजेरी मारुतीमंदिर ते महाद्वार चौक आणि पालिका चौक ते महाद्वार चौक हा रस्ता तयार केला जाणार आहे. 

यासाठीचा निधा पालिका यात्रा निधीतून खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान पिंपरी महापालिकेला रस्ता दुरुस्तीसाठी पत्र यापूर्वीच दिले होते. आमदार महेश लांडगे आणि महापौर नितीन काळजे यांनी प्रदक्षिणा रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. पिंपरी महापालिकेला निधी देण्यात तांत्रिक अडचण आली तर जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने यात्रा निधी या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खर्च केला जाणार आहे. याशिवाय चाकण चौक ते देहूफाटा हा रस्ताही केला जाणार आहे.