पालखी मार्गाची देखभाल दुरुस्ती व्हावी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 June 2017

हडपसर - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना पालखी मार्गाची देखभाल दुरुस्ती अद्यापही संबंधित विभागांनी केलेली नाही. पालखीपूर्वी सोलापूर व सासवड रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे आणि खड्डे दुरुस्त करण्याबाबत महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने काहीही प्रयत्न केलेले नाहीत. 

दोन्ही रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा, वाढलेली धोकादायक झुडपे, विद्युत खांब, झाडे, अनधिकृत जाहिरात फलक काढणे, साइडपट्ट्या दुरुस्त करणे, रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून टाकलेल्या टपऱ्या, हातगाड्या व फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी भाविकांनी व ग्रामस्थांनी केली आहे. 

सासवड रस्त्याचे काम रखडले असून, रस्त्याची साइडपट्टीही व्यवस्थित करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग व बांधकामांचा राडारोडा टाकला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी गर्दीच्या वेळी भाविक रस्त्याच्या कडेने चालताना पडण्याची शक्‍यता आहे. 

याबाबत वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक पी. एम. शिंदे म्हणाले, ""हडपसर व सोलापूर रस्त्यावरील राडारोडा उचलणे, अतिक्रमण काढणे, पावसामुळे ज्या ठिकाणी पाणी साठते त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करणे तसेच दोन्ही रस्त्यांवरील सर्व अतिक्रमण हटविणे याबाबतचे लेखी पत्र महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news palkhi hadapsar road