हनुमान चालीसा वाचण्याआधी स्नान करणे व स्वच्छ कपडे घालणे आवश्यक आहे. अशुद्ध मनाने किंवा गलिच्छ जागी वाचन केल्यास त्याचे फळ मिळत नाही.
चालीसा वाचताना शब्दांचा चुकीचा उच्चार टाळावा. त्यामुळे मंत्रशक्ती कमी होऊ शकते. योग्य उच्चार शिकून हळूहळू आणि स्पष्ट वाचन करावं.
मन भटकवत किंवा घाईघाईत वाचन टाळावं. शांत आणि एकाग्र मनाने, हनुमानजींचं ध्यान करत हनुमान चालिसा वाचन करावी.
रात्री उशिरा किंवा राहुकाळात हनुमान चालिसा वाचू नये. सकाळचा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळ वेळी ही हनुमानचालिसा वाचनासाठी सर्वोत्तम आहे.
पुस्तक जमिनीवर ठेवणे, घाण हातांनी हाताळणे किंवा दुर्लक्ष करत वाचन करणे हे चुकीचं आहे. त्यामुळे त्या पुस्तकाचा सन्मान करावा.
स्नानानंतर हनुमानजीसमोर दिवा लावायला विसरू नये. यामुळे वातावरण शुद्ध व सात्विक राहते.
शुद्धता, योग्य उच्चार आणि भक्तीभावाने हनुमान चालिसा वाचल्यास त्याचं योग्य ते फळ मिळते. त्यामुळे मनापासून वाचन करा.
ही माहिती धार्मिक मान्यता आणि ग्रंथांवर आधारित आहे. कृपया कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.