माझी प्रेरणा, माझी सखी 

अक्षया हिंदळकर, अभिनेत्री 
Saturday, 19 December 2020

माझ्या प्रत्येक ऑडिशनला ती सोबत असायची. तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती माझ्याद्वारे जगते आहे, असं म्हटलं तरी चालेल. माझी आई स्वभावाने अतिशय शांत आहे. तिच्यात सहन करण्याची ताकद प्रचंड आहे.

माझ्या आईचं नाव सुरेखा हिंदळकर. आईला अभिनय क्षेत्र आणि नृत्याची खूप आवड होती, त्यामुळे लहानपणीच तिनं मला भरतनाट्यम क्लासला घातलं. त्यानंतर शिक्षण घेता-घेता मी थिएटर करायला सुरुवात केली. मी सहा वर्षं प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं केली. ‘ती तशीच होती’, ‘बाजीराव-मस्तानी’ या नाटकांत अभिनय केला. 

माझ्या प्रत्येक ऑडिशनला ती सोबत असायची. तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती माझ्याद्वारे जगते आहे, असं म्हटलं तरी चालेल. माझी आई स्वभावाने अतिशय शांत आहे. तिच्यात सहन करण्याची ताकद प्रचंड आहे. आईचा हा गुण माझ्यात आला आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. आमचं किराणा मालाचं छोटंसं दुकान होतं. आम्ही भाजी आणि छोट्या मोठ्या गोष्टी विकायचो. मी आणि माझी बहीण आई-बाबांना मदत करायचो. कोणतंही काम छोटं-मोठं नसतं. प्रत्येक परिस्थितीला हसत-हसत सामोरं जावं, हा संस्कार तिने लहानपणापासूनच माझ्या मनावर बिंबवला. 

आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा

सध्या मी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या नव्या मालिकेत मी स्वाती ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारते आहे. यापूर्वी मी ‘सरस्वती’ व ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्ये खलनायिकेची मुख्य भूमिका साकारली. तसंच, ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेतही मी काम केलं आहे. ‘रॉकी’ या चित्रपटातही अभिनय केला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्या नव्या मालिकेचं चित्रीकरण मुंबईजवळच्याच मढ इथं सुरू आहे. त्यामुळे मी सध्या मालाड इथं राहतेय. परिणामी, आईशी दररोज भेट होत नाही. मात्र, दिवसभराच्या सर्व गप्पा आम्ही रात्री फोनवर मारतो. माझ्या आईशी मी सर्व गोष्टी अगदी मैत्रिणीप्रमाणे शेअर करते. तिच्या हातची पुरणपोळी, मुगाची खिचडी आणि चिकन करी या गोष्टी मी खूप मिस करते आहे. लॉकडाऊनच्या काळात आईनं माझ्या खाण्यापिण्यावर खूप लक्ष दिलं. योग्य आहार आणि डाएटच्या मदतीने मी जवळपास नऊ किलो वजन कमी केलं. याचा फायदा मला ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेतली व्यक्तिरेखा साकारण्यासाठी होतो आहे. माझा नवा लूक प्रेक्षकांना आवडतो आहे. याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देईन. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(शब्दांकन : अरुण सुर्वे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about actor akshaya hindalkar