esakal | सेलिब्रिटी वीकएण्ड - मित्र मैत्रिणींशी दंगा आणि मस्ती....
sakal

बोलून बातमी शोधा

Dipti-Dhotre

दीप्तीनं आत्तापर्यंत ‘भोंगा’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘विजेता’ यांसारख्या चित्रपटांत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या वीकएण्डबद्दल तिनं सांगितलं, ‘अभिनय क्षेत्रात आपण काम करताना वीकएण्ड मिळतच नाही. मी वीकएण्डला घरी असल्यास मला बाहेर फिरायला जायला आवडतं. माझ्या मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायला आवडतं. त्यांच्याशी बोलून, छान मनमोकळ्या गप्पा गोष्टी करून खूप फ्रेश वाटतं.

सेलिब्रिटी वीकएण्ड - मित्र मैत्रिणींशी दंगा आणि मस्ती....

sakal_logo
By
दीप्ती धोत्रे, अभिनेत्री

दीप्तीनं आत्तापर्यंत ‘भोंगा’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘विजेता’ यांसारख्या चित्रपटांत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या वीकएण्डबद्दल तिनं सांगितलं, ‘अभिनय क्षेत्रात आपण काम करताना वीकएण्ड मिळतच नाही. मी वीकएण्डला घरी असल्यास मला बाहेर फिरायला जायला आवडतं. माझ्या मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायला आवडतं. त्यांच्याशी बोलून, छान मनमोकळ्या गप्पा गोष्टी करून खूप फ्रेश वाटतं. त्याचप्रमाणं मला मॉल्समध्ये जाऊन शॉपिंग करायला, लॉंग ड्राईव्हला जायलाही प्रचंड आवडतं. मी अनेकदा बाहेर न जाता स्वतःसाठीही वेळ देते. मला फिल्म्स बघायला खूप आवडतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी सगळ्या फिल्म्स न चुकता थिएटरमध्ये जाऊन पाहते. खरं सांगायचं तर वाचन, स्वयंपाक, योगासनं यांप्रमाणेच अभिनय हाही माझा छंद आहे आणि याच क्षेत्रात काम करत असल्यामुळं तो छंद जोपासायला मला वीकएण्डची खास वाट पाहावी लागत नाही. तसंच मला वाचन करायला प्रचंड आवडतं. माझ्याजवळ नेहमी एखादं पुस्तक असतंच. वाचनही मी रोज करत असल्यामुळं वीकएण्डला वेगळा वेळ काढावा लागत नाही, तो आता रोजच्याच सवयीचा भाग बनलाय. मी रोज जिम आणि योगासने करते.

वीकएण्डला जिमला सुट्टी असल्यानं तो वेळ मी घरी योगासनं करण्यात सत्कारणी लावते. वीकएण्डला थोडा निवांत वेळ मिळत असल्यामुळं मला योगाचे वेगवेगळे प्रकार इंटरनेटवरून शोधायला, त्याची माहिती मिळवायला आवडतं. मला नृत्य करायलाही आवडतं. त्यामुळं वीकएण्डला मी नृत्याचे वेगवेगळे वर्कशॉप्स अटेंड करते, नृत्य शिकते. वीकएण्डला मुद्दाम अशी करायला आवडणारी गोष्ट म्हणजे स्वयंपाक, तो करायला मला मनापासून आवडतं. एरवी शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमुळं जेवण बनवायला फारसा वेळ मिळत नाही, मात्र मी घरी असताना आवडणारे सर्व पदार्थ स्वतः बनवते. मला सर्वाधिक साउथ इंडियन पद्धतीचं जेवण आवडतं व ते मीच बनवते. मित्रमैत्रिणींना वेळ देऊन, स्वतःसाठी वेळ देऊन वेगवेगळ्या गोष्टी शिकून वीकएण्ड सेलिब्रेट करते.
(शब्दांकन - राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil

loading image