esakal | मेमॉयर्स : आमचा आधारवड!
sakal

बोलून बातमी शोधा

आई जयश्रीसह दीप्ती धोत्रे.

आम्ही चौघी बहिणी अन् एक भाऊ. मी अवघी सहा वर्षांची असतानाच बाबा गेले. त्या वेळी माझ्या आईचे वय अवघे २४-२५ वर्षांचे होते. बाबा गेले, तरी ती खचली नाही अन् डगमगलीही नाही. कारण, तिला तिच्या जबाबदारीची जाणीव होती. त्या वेळी ती सोलापूरमध्ये जलसंपदा विभागात नोकरी करत होती. तिने नोकरी करता करता आम्हाला अगदी फुलांप्रमाणे सांभाळले

मेमॉयर्स : आमचा आधारवड!

sakal_logo
By
दीप्ती धोत्रे, अभिनेत्री

आम्ही चौघी बहिणी अन् एक भाऊ. मी अवघी सहा वर्षांची असतानाच बाबा गेले. त्या वेळी माझ्या आईचे वय अवघे २४-२५ वर्षांचे होते. बाबा गेले, तरी ती खचली नाही अन् डगमगलीही नाही. कारण, तिला तिच्या जबाबदारीची जाणीव होती. त्या वेळी ती सोलापूरमध्ये जलसंपदा विभागात नोकरी करत होती. तिने नोकरी करता करता आम्हाला अगदी फुलांप्रमाणे सांभाळले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आम्हा पाच जणांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी तिने आम्हाला पाठबळ दिले. आम्हाला व्यवस्थित अन् चांगले शिक्षण मिळण्यासाठी तिने खूपच कष्ट घेतले. त्यामुळेच मी उच्च शिक्षण घेऊन फिल्म इंडस्ट्रीत आले. माझी मोठी बहीण एम. फिल झाली, तर लहान बहिणीनं एमएसडब्ल्यू केलं. भाऊ अन् एका बहिणीने इंजिनिअरिंग केले. हे सर्व शक्‍य झाले ते आईच्या कष्टांमुळेच.

खरेतर आमच्या कुटुंबामध्ये अभिनय क्षेत्रात येण्यासाठी विरोध होता; पण आई मॉडर्न विचारांची होती. नवनवीन गोष्टी शिकायला तिला आवडत होत्या. हेच नव्हे, तर जसा काळ बदलत चालला आहे, त्याप्रमाणे बदलण्याची तिच्यामध्ये ताकद होती. त्यामुळे अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी तिने मला पाठिंबा दिला. माझ्याबरोबरच आम्हा भावंडांना कोणत्याही गोष्टींना विरोध केला नाही. ‘मला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटेल,’ असे वागण्याचा सल्ला तिने आम्हाला वेळोवेळी दिला. माझ्या करिअरमध्येही तिचा सिंहाचा वाटा होता. खरेतर मी तिच्याकडूनच पेशन्स, हार्डवर्किंग हे गुण घेतले आहेत. 

ज्या वेळी मी ‘मुळशी पॅटर्न’, ‘भोंगा’, ‘विजेता’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला, त्या वेळी तिच्यासह आमच्या सर्व कुटुंबीयांना खूप आनंद झाला. माझे आगामी काळातही दोन चित्रपट येत असून, त्यामध्ये मी मुख्य भूमिका साकारत आहे.

त्याचबरोबर वेबसीरिजमध्येही काम करणार आहे. छोट्या पडद्यावर येण्याची माझी इच्छा आहे. फक्त तशी भूमिका असायला हवी. कारण, आई नेहमीच म्हणते की, ‘नेहमी वेगवेगळ्या माध्यमांत काम करावं. प्रत्येक ठिकाणी आपले नाव कमवावे अन् स्वतःसह सर्वांनाच आनंद अन् अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी.’ आईच्या या इच्छेनुसारच मी वाटचाल करत असून, तिला अभिमान वाटेल अशा गोष्टी मी नक्कीच करणार आहे.
(शब्दांकन - अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

loading image