वुमन हेल्थ : 'आयव्हीएफ' नंतरची काळजी

IVF
IVF

इन-विट्रो फर्टिलायजेशन (आयव्हीएफ) ही वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रभावी आणि तितकीच नाजूक प्रक्रिया आहे. त्यामुळे महिलांनी या प्रक्रियेआधी आणि नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ‘आयव्हीएफ’मध्ये बीज अंड्यांचे फलन शरीराबाहेर होते आणि मग त्यांचे महिलेच्या गर्भाशयात पुनःरोपण केले जाते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, याचे यश दोन गोष्टींवर अवलंबून असते, ते म्हणजे गर्भाशयाची ग्रहणशीलता आणि भ्रूणांची गुणवत्ता. बहुतांश अयशस्वी रोपणांना भ्रूणांमधील विकृती कारणीभूत ठरते. बीजांडे चांगल्या गुणवत्तेचे नसल्यास भ्रूण रोपण करण्यासाठी योग्य नसतात. तुम्ही ज्या प्रकारे स्वतःची काळजी घेऊ शकता त्याचा परिणाम भ्रूणांच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. आपले शरीर या प्रक्रियेसाठी तयार असावे आणि यशाची सर्वोत्तम शक्यता निर्माण होण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते. 

1) औषधे वेळेवर घ्या
डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेवर व योग्यरितीने घ्या. रोपण प्रक्रियेसाठी आणि भ्रूणांच्या जलद विकासासाठी फायदा होतो. 

2) नियमित व्यायाम करा
स्थूलतेची समस्या आहे किंवा शारीरिक परिस्थिती खराब असलेल्या महिलांमध्ये ‘आयव्हीएफ’ कालचक्रामध्ये गर्भवती होण्याची शक्यता कमी असते. हलक्या किंवा मध्यम प्रकारच्या व्यायामामुळे वजन आणि रक्ताभिसरण नियंत्रित राहते. थोड्या अंतरासाठी चालणे, योग अशा प्रकारचे व्यायाम योग्य सल्ला घेऊन करावेत. 

3) पुरेशी झोप व योग्य आहार
गर्भवती होण्याची शक्यता वाढवण्यासाठी चांगली शारीरिक परिस्थिती निर्णायक ठरू शकते. म्हणूनच ‘आयव्हीएफ’च्या कालचक्राच्या कमीत कमी सहा आठवडे आधीपासून योग्य आहार आणि पुरेशी झोप याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. 

4) एम्ब्रियो स्क्रिनिंग
सर्वांत योग्य भ्रूणांसाठी त्यांची जनुकीय चाचणी प्रभावी ठरू शकते. 

आयव्हीएफ नंतर घ्यायची काळजी 

  • आयव्हीएफ प्रक्रियेचे यश हे अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यात महिलेची जीवनशैली आणि आहाराचा समावेश आहे. म्हणूनच ‘आयव्हीएफ’ प्रक्रियेनंतर काळजी घेतल्यास महिलेच्या शरीरावर आणि साहजिकच तिच्या बळावर सकारात्मक परिणाम होतो. 
  • ‘आयव्हीएफ’ प्रक्रियेदरम्यान आणि नंतर ताणतणावाचे व्यवस्थापन योग्य रीतीने करावे. प्रक्रियेच्या परिणामांबाबत काळजी करण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्यावी आणि ध्यानधारणा केल्यास ताण कमी होण्यास मदत होते. 
  • स्वतःवर जास्त ताण देण्यापेक्षा या काळाचा आनंद घ्यावा. आजकाल अनेक सपोर्ट ग्रुप्स असतात, त्यात सहभागी झाल्यास अधिक फायदा होईल. 
  • ‘आयव्हीएफ’ प्रक्रियेनंतर देखील योग्य आहार आणि व्यायाम सुरू ठेवावा. जास्त वजनदार वस्तू उचलू नका. डॉक्टरांनी दिलेला सल्ला योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे पाळा आणि या काळाचा आनंद घ्या!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com