esakal | वुमनहूड : माझी 'कन्या रास'
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika-Deshpande

मी : ‘‘अंतरा, माझा फोन का उचलत नाहीयेस तू?’’
अंतरा : ‘‘शंभर वर्षं आयुष्य. आत्ताच मी तुझी आठवण काढत होते आणि हे काय, उचलला की! उचलला नसता तर आत्ता आपण बोलत असतो का? अगं, कामात असल्यास कसा उचलणार फोन? तू घरी नसताना मला खूप कामं असतात आई.’’

वुमनहूड : माझी 'कन्या रास'

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री

मी : ‘‘अंतरा, माझा फोन का उचलत नाहीयेस तू?’’
अंतरा : ‘‘शंभर वर्षं आयुष्य. आत्ताच मी तुझी आठवण काढत होते आणि हे काय, उचलला की! उचलला नसता तर आत्ता आपण बोलत असतो का? अगं, कामात असल्यास कसा उचलणार फोन? तू घरी नसताना मला खूप कामं असतात आई.’’
मी : ‘‘शिष्टपणा करू नकोस. एवढी काही मोठी झाली नाहीयेस तू अजून.’’
अंतरा : ‘‘आई, तू एकदाचं नक्की ठरव मी मोठी झाली आहे की लहान आहे ते. आई, काय झालंय? मूड ठीक नाही का तुझा?’’ 
मी : ‘‘तुला कसं कळलं?’’
अंतरा : ‘‘मी तुझी मुलगी आहे. मला नाहीतर कोणाला कळणार?’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...हे संवाद कुठल्याशा मालिकेतले किंवा सिनेमातले नाहीत. हे माझे आणि माझी मुलगी अंतरामधले. अंतरा बारा वर्षांची झाली, तेव्हा आम्ही ती नको म्हणत असतानाही फोन घेऊन दिला. अडीनाडीला कामी यावा म्हणून. सध्या त्याचा उपयोग ऑनलाइन क्लासेस आणि माझ्याशी गप्पा मारता याव्या म्हणून. कारण मी सध्या शूटिंगसाठी मुंबईत आहे. तिचा फोन तिच्या सवयीचा भाग आहेच; परंतु ती माझी गरज होऊन बसली आहे. पोरीशी दोन दिवस बोलणं न झाल्यास जीव कासावीस होतो. आईचा जन्म झाला, की तिच्या काळजाचे दोन तुकडे होतात. एक तुकडा तिच्यात, तर दुसरा तिच्या पिल्लात. माझं बोलणं समजायला कठीण वाटू शकेल; पण आई होऊन पाहिलंत तर सोप्पं आहे.

माझं आई म्हणून वय तेरा आहे. मी अजूनही शिकते आहे. मी फाजील, आगाऊ, थोडी शहाणी आणि थोडी वेडी आई तुम्हाला वाटू शकते- कारण माझं आई म्हणून वय फार झालेलं नाहीये. अंतरा मात्र तिच्या किशोरावस्थेतून यौवनात प्रवास करते आहे. ती अधिक समजूतदार होते आहे. ‘‘अंतरा माझा फोन का नाही उचललास?’’ या माझ्या प्रश्नावर तिची उत्तरं खालीलप्रमाणे असतात :

‘आई, तू नसल्यानं मीच आज स्वयंपाकघरात बाबांसाठी पालक पनीर आणि दाल मखनी बनवत होते.’़’, ‘‘थोडं किराणा सामान सायकलवरून आणत होते आणि तूच म्हणतेस ना सायकलवर असताना कोणाचेही फोन घ्यायचे नाहीत.’’, ‘‘या वेळेला का फोन केलास? तुला माहिती आहे नं माझे ऑनलाइन क्लासेस असतात.’’, ‘‘अगं, मी आजीशी गप्पा मारत बसले होते. तिलाही वाटतं कोणाशी तरी बोलावंसं म्हणून तुझा फोन घेतला नाही.’’

अंतरा अशी उत्तरं देते, तेव्हा कळतं, की मुलगी मोठी होते आहे आणि आई म्हणून आपल्यालाही मोठं व्हायला हवं आहे. अंतराकडे सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं असतात. कालपर्यंत माझ्याशिवाय पान न हलणाऱ्या मुलीचं विश्‍व आता बदलत चाललं आहे. तिनं स्वतः कोऱ्या पानांच्या वहीमध्ये रूप, रंग, गंध, स्पर्श आणि शब्द भरायला घेतले आहेत. त्याचा मला आनंदच आहे, परंतु आई आहे ना मी. साक्षर, स्वतंत्र, स्वाभिमानी बनवण्याची घाई करून बसलो की काय असा प्रश्न मन मोठं असलेल्या माझ्या ‘छोट्याशा आईला’ प्रश्‍न करावासा वाटतो.... हे सगळं कोडंच आहे. 

अंतराला मी परत विचारते....‘‘तुला कसं कळलं माझा मूड ठीक नाही आहे ते.’’
अंतरा : ‘‘अगं, तुझ्या आवाजावरून कळलं. आणि तुला कसं कळलं, की मला तुझी आत्ता आठवण येत होती ते?’’
मी : ‘‘कारण मी तुझी आई आहे म्हणून. आणि मला तिसरा डोळा आहे.’’ 
अंतरा : ‘‘आई सांग न!’’
मी : ‘‘पुढच्या वेळेस ‘एक दोन साडे माडे तीन’ म्हणायच्या आत फोन उचललास तर सांगेन.’’
अंतरा : ‘‘आई…!!…!!’’

Edited By - Prashant Patil