esakal | जोडी पडद्यावरची : लक्षवेधी स्वामिनी
sakal

बोलून बातमी शोधा

Revati Lele-and-Aishwarya Narkar

‘स्वामिनी’ ही कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली मालिका कायमच उत्सुकता वाढवणारी ठरली आहे. ऐश्वर्या नारकर यात गोपिकाबाईंच्या भूमिकेत आहे, तर मोठ्या रमाबाई पेशवे यांच्या भूमिकेत अभिनेत्री रेवती लेले.

जोडी पडद्यावरची : लक्षवेधी स्वामिनी

sakal_logo
By
रेवती लेले-ऐश्वर्या नारकर

‘स्वामिनी’ ही कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली मालिका कायमच उत्सुकता वाढवणारी ठरली आहे. ऐश्वर्या नारकर यात गोपिकाबाईंच्या भूमिकेत आहे, तर मोठ्या रमाबाई पेशवे यांच्या भूमिकेत अभिनेत्री रेवती लेले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेवती आणि ऐश्वर्या यांची पहिली भेट झाली ती थेट ‘स्वामिनी’च्या सेटवरच आणि ते सुद्धा लॉकडाउननंतर! रेवती म्हणते, ‘मी ऐश्वर्याताईंना पहिल्यांदा भेटले ते शुटिंगच्याच दिवशी. त्या माझ्यापेक्षा अनुभवाने, वयाने मोठ्या आहेत. त्यामुळे मला खूप भीतीच वाटत होती, परंतु पहिल्याच दिवसापासून त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. मला तर खूप टेन्शन आलं होतं. मात्र त्यांच्याशी हळूहळू बोलायला लागल्यावर टेन्शन निघून गेलं.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऐश्वर्या नारकर गोपिकाबाईंच्या भूमिकेविषयी म्हणाल्या, ‘गोपिकाबाई ही भूमिका करताना खूप मजा येत आहे. मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी आहे. दिग्दर्शक विरेंद्र प्रधान याने मला गोपिकाबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील कंगोरे खूप उत्तम प्रकारे समजावले. त्याचा उपयोग भूमिका साकारताना होत आहे. गोपिकाबाई स्पष्टवक्त्या, करारी आहेत, त्यांच्या तत्त्वांशी ठाम राहणाऱ्या आहेत. परंतु स्वतःची चूक झाली, तरी त्या ती मान्य करणाऱ्या देखील आहेत. ‘स्वामिनी’मध्ये लहान रमाबाईंना कोंडून ठेवण्याचा प्रसंग करताना मात्र माझ्या मनाला त्रास झाला होता.’

रेवती म्हणते, ‘मी ऐश्वर्याताईंच्या भूमिका माझ्या लहानपणापासून पाहत आले आहे. त्यांची ‘सोयरे सकळ’ नाटकातील भूमिका आणि त्यांनी काम केलेल्या अनेक मराठी चित्रपटातील भूमिका मला आवडल्या आहेत. मी या क्षेत्रात नवोदित असल्याचे त्यांनी कधीच जाणवू दिले नाही. त्यांचा हा स्वभाव मला खूप आवडतो.’

रेवतीने ‘मोगल-ए-आजम’ या नृत्यनाट्याचे अनेक प्रयोग केले आहेत. तिने परदेशात देखील कथक नृत्याचे कार्यक्रम केले आहेत. लॉकडाउनच्या काळात तिने परदेशस्थ नागरिकांसाठी भारतातून त्याचे ऑनलाइन क्लासेस घेतले.

ऐश्वर्या नारकर यांनी लॉकडाउनच्या काळात अनेक पुस्तकांचे वाचन केले. सामाजिक प्रसारमाध्यमांवर त्या विशेष सक्रिय नव्हत्या. त्यांनी काही कथांचे अभिवाचन केले, तसेच काही लिखाणही केले. डाएट, योगासने, घराची आवराआवर यात त्यांनी वेळ घालवला. व. पु. काळे यांच्या ‘पप्पा’ या कथेचे त्यांनी आणि अविनाशने अभिवाचन केले, तर त्याला संगीत हे त्यांच्या मुलाने, म्हणजे अमेयने दिले होते. रमाबाईंची भूमिका साकारणे हा रेवतीच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट म्हटला पाहिजे. 
(शब्दांकन - गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil