esakal | ग्रुमिंग + : घराच्या घरी मेकअपसाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Makeup

फॅशन, आउटफिट, स्टाइलसोबतची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मेकअप’. प्रत्येक मुलीला मेकअप करण्याची आवड असतेच. मेकअप करणं हे काही सोप्पं नाही. काही मुली रोज मेकअप करतात तर, काही खास कार्यक्रमासाठी. आउटफिटप्रमाणं आणि जागेप्रमाण मेकअपचे प्रकार ठरतात. घरच्या घरी मेकअप कसा करावा याच्या टिप्स जाणून घ्या. रोज तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटत असता आणि अनेक ठिकाणीही जाता. अशावेळी थोडासा मेकअप करण्यास काहीच हरकत नाही!

ग्रुमिंग + : घराच्या घरी मेकअपसाठी...

sakal_logo
By
ऋतुजा कदम

फॅशन , आउटफिट, स्टाइलसोबतची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मेकअप’. प्रत्येक मुलीला मेकअप करण्याची आवड असतेच. मेकअप करणं हे काही सोप्पं नाही. काही मुली रोज मेकअप करतात तर, काही खास कार्यक्रमासाठी. आउटफिटप्रमाणं आणि जागेप्रमाण मेकअपचे प्रकार ठरतात. घरच्या घरी मेकअप कसा करावा याच्या टिप्स जाणून घ्या. रोज तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटत असता आणि अनेक ठिकाणीही जाता. अशावेळी थोडासा मेकअप करण्यास काहीच हरकत नाही!

चेहरा - 

 • सर्वांत आधी चेहऱ्यावर फाउंडेशन लावा. फाउंडेशन हा तुमच्या मेकअपचा बेस असतो. 
 • तुमच्या स्किन टोनप्रमाणं फाउंडेशनची योग्य शेड निवडा.
 • ‘सीसी क्रिम’ म्हणजे कलर करेक्शन क्रिम. हे रोज ऑफिस किंवा कॉलेजला जाताना लावू शकता. हे क्रिम बिना मेकअप तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक आणि सुंदर लुक देतं.
 • हलकीशी कॉम्पॅक्ट पावडर लावा.
 • मेकअप उठून दिसण्यासाठी चिकबोन्सला हायलाइट करा. अर्थात, गालाच्या उंचवट्यांना हलकासा गुलाबी रंग देऊन तो ब्रशने फिरवा. आता हायलाइटर ट्यूब सहज मिळते. ते गालावर, नाकाचे फिचर्स हायलाइट करण्यासाठी वापरू शकता. 

डोळे -

 • आयमेकअप हा संपूर्ण चेहऱ्याला एक वेगळाच लुक देतो. 
 • त्यासाठी आयशॅडो गोलाकार पद्धतीने लावा. 
 • डोळ्यांच्या मेकअपसाठी वेगळा ब्रश वापरला जातो.
 • कपड्यांचा रंग लक्षात घेऊनच आयशॅडो लावा. ग्लीटरचाही वापर करू शकता. 
 • आयलायनरही शार्प लावा. नैसर्गिक आयलॅश या दाट नसतात त्यासाठी खोट्या लावू शकता.
 • आयशॅडो लावल्यावर त्यावर आयलायनर आणि मस्कारा वापरा. त्यामुळे डोळे नेहमीपेक्षा उठून दिसतात. 
 • अनेक मुली काजळ लावतात. काजळ सर्वांनाच सूट होत नाही.

ओठ -

 • लिपस्टिकसाठी तुमच्या कपड्यांचा रंग लक्षात घेऊन शेड निवडा.
 • लिपस्टिक लावण्याआधी लिप पेन्सिलने बॉर्डर बनवा. 
 • लिपस्टिक जास्त गडद नसावी. रोजच्या वापरासाठी तुम्ही न्यूड कलर्स, लाइट पिंक, पिंक, लाइट रेड असे शेड्स वापरू शकता.
 • लिपस्टिक वापरताना ऋतुचाही विचार करावा. उन्हाळा व ओठाची त्वचा लक्षात घेऊन लिपस्टिक निवडावी. कुठलाही त्रास होत असल्यास लिपस्टिक बदलावी.
 • तुम्ही तुमचे ओठ अधिक मॉइश्चराइज्ड केले तर लिपस्टिकच्या विविध प्रकारच्या शेड्‌स ओठावर खुलून दिसतील. 
 • दुभंगलेल्या ओठामुळे लिपस्टिकचा रंग फिका पडू शकतो. त्यामुळे नेहमी ओठांना लिप बाम लावावा.