रिकाम्या वेळेचा सदुपयोग 

आशिष तागडे 
Saturday, 19 December 2020

रिकाम्या वेळात तुझं काय चालतं,असा प्रश्न तू स्वतःला कधी विचारला आहेस का?आता आठवून सांग,रिकाम्या वेळात टीव्ही,मोबाईलवरचा टाईमपास असंच काही चालतं का?फक्त तेवढंच चालत असेल तर या वेळात काय होऊ शकतं बघ

प्रथमेश नेहमीप्रमाणे दुपारी मोबाईलमध्ये व्यग्र होता. घरात काय चालले याकडे त्याचे अजिबात लक्ष नव्हते. आजी सुरुवातीला त्याला यावरून बोलायची, परंतु आजी नेहमीच बोलते म्हणून तो आता त्याकडेही दुर्लक्ष करायला लागला. आता तर शाळाही ऑनलाइन असल्याने त्याला मोबाइल खेळायला पर्वणीच मिळाली होती. आता मला नवीन मोबाइल द्या असा त्याचा आग्रह सुरू झाला होता. आता त्याला रागविण्याऐवजी वेगळा प्रयोग करू असा विचार आजीच्या मनात आला. प्रथमेश दिवसभर काय करतो, याची आजीला पक्की खात्री होती, तरीही तिने मुद्दाम विचारले, ‘‘अरे प्रथमेश, रिकाम्या वेळेत तू काय करतोस? म्हणजे तुझ्याकडे रिकामा वेळ असतो का?’’ आजीच्या प्रश्नाचा रोख प्रथमेशच्या लक्षात आला. त्यावर तो म्हणाला, ‘‘अगं आजी, इथे कोणाला रिकामा वेळ असतो. शाळा झाली की, हा क्लास नाहीतर तो क्लास. त्यातून थोडा वेळ मिळाला, तर मोबाईलवरच गेम खेळावा लागतो. बाहेर जाण्याची कोठे सोय आहे?’’ प्रथमेशने आपली सुटका करून घेण्यासाठी मैदाने बंद असल्याचे मुद्दाम लक्षात आणून दिल्याचे आजीने ताडले होते. त्यावर ती म्हणाली, ‘‘दिवसभर शाळा असली, अभ्यास असला, तरी रिकामा वेळही असतो. या रिकाम्या वेळात तुझं काय चालतं, असा प्रश्न तू स्वतःला कधी विचारला आहेस का? आता आठवून सांग, रिकाम्या वेळात टीव्ही, मोबाईलवरचा टाईमपास असंच काही चालतं का? फक्त तेवढंच चालत असेल तर या वेळात काय काय होऊ शकतं बघ. 

आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा

१. रिकामा वेळ मिळाला, की टीव्ही, मोबाईल बघावासा वाटतो. थोडा वेळ टीव्ही बघ. कोणत्याही प्रकारच्या ‘स्क्रीन’चं एक प्रकारचं व्यसन लागू शकतं. ज्यावेळेस आपल्याला एखादी सवय लागते आहे हे आपल्या लक्षात येतं. जर ती सवय वाईट असेल तर लगेच आणि ताबडतोब त्या वस्तूपासून लांब राहा. 

२. पुनःपुन्हा टीव्ही बघावासा वाटेल. पुनःपुन्हा मोबाईलवर गेम खेळावासा वाटेल; पण त्याकडे लक्ष देऊच नको. दुसरी कोणतीही आवडीची गोष्ट कर. 

३. कसलेही प्रयोग कर. नवीन कलात्मक वस्तू घरच्या घरी तयार करण्याचा प्रयत्न कर. पाढे पाठ करण्याची एखादी नवी पद्धत सापडते का? सकाळी स्वत:हून उठायची सवय लावायची असेल तर काय करावं लागेल? स्वत:हून अक्षर सुधारण्यासाठी काय प्रयत्न करता येतील? असे कितीतरी प्रयोग तू स्वत:वर करू शकतोस. मिळेल ते वाचन हाही रिकाम्या वेळातला एक फार मस्त उद्योग आहे. आवडेल तेच वाच. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रिकाम्या वेळात अशा ढीगभर गोष्टी आपण करू शकतो. त्या फक्त मनावर घ्यायला शिक. मनावर आवर घालायला आता शिकलास तर आयुष्यात मोठे निर्णय घेताना त्याचा फायदाच होईल.’’ 

आजीचे सहज सोपे उपाय प्रथमेशला खूप आवडले. ‘अगं आजी हे खरंच शक्य आहे, मी आजपासूनच त्याची अंमलबजावणी करतो,’ असे सांगत त्याने आजीला घट्ट मिठी मारली. दुसरीकडे प्रथमेशची आई, डोळ्याचा कडा पुसत आपल्या कामाला लागली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashish tagde write article Empty time utilization

Tags
टॉपिकस
Topic Tags: