बाळाला पाठीवर झोपवा! 

 डॉ. अमोल अन्नदाते 
Saturday, 12 December 2020

अमेरिकेत ‘स्लीप ऑन बॅक कॅम्पेन’ अर्थात लहान बाळांसाठी ‘पाठीवर झोपवा’ ही राष्ट्रव्यापी आरोग्य शिक्षणाची मोहीम राबवण्यात आली. भारतात अशा झोपेत मृत्यू होणाऱ्या बालकांचे प्रमाण खूप आहे. 

अमेरिकेत एकेकाळी पहिल्या वर्षात पोटावर झोपल्यामुळे श्वास गुदमरून काही बालकांचे मृत्यू झाले. बऱ्याचदा झोपेत अचानक झालेल्या मृत्यूचे हे कारण असते. याला ‘सडन इन्फन्ट डेथ सिंड्रोम’ असे म्हणतात. यामुळे अमेरिकेत ‘स्लीप ऑन बॅक कॅम्पेन’ अर्थात लहान बाळांसाठी ‘पाठीवर झोपवा’ ही राष्ट्रव्यापी आरोग्य शिक्षणाची मोहीम राबवण्यात आली. भारतात अशा झोपेत मृत्यू होणाऱ्या बालकांचे प्रमाण खूप आहे. म्हणून अशा मोहिमेची भारतातही गरज आहे. 

आईशी संवाद : चिडचिडेपणाचं करायचं काय? 

हे टाळण्यासाठी काय करावे ? 
- रात्रीच्या वेळी व दुपारी जेव्हा आईसुद्धा बाळासोबत झोपलेली असल्यास, म्हणजे झोपलेल्या बाळाकडे लक्ष देण्यास कोणी नसल्यास बाळाला पाठीवर झोपवा. 

- झोळीत मुळीच झोपवू नका, कारण झोळीतून पडण्याचे व झोळीत श्वास गुदमरण्याचे प्रमाण जास्त असते. 

- बाळ झोपेत पोटावर किंवा एका अंगावर झाल्यास हळूच परत सरळ करावे. अशा स्थितीत आपण बाळाच्या बाजूला बसून त्याच्यावर सतत लक्ष ठेवणार असल्यास ठीक, पण आई झोपणार असल्यास बाळाला सरळ करून दोन्ही बाजूने उशी लावून त्याचे झोपेत परत पोटावर येणे रोखता येईल. 

- बाळाला शक्यतो कडक गाडीवर झोपवावे. बाळ झोपतो ती गादी बाळाच्या वजनाने फार खाली किंवा आत जाणारी नसावी. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- बाळ झोपते त्याच्या आजूबाजूला उशी, खेळणी, टेडी बेअर किंवा त्याच्या तोंडावर येईल अशा गोष्टी ठेवू नये. 

- बाळावर पांघरून टाकताना त्याचा चेहरा उघडा राहील असे पाहावे. 

- बाळ दुपट्यात गुंडाळताना ते खूप घट्ट गुंडाळू नये. छाती व हातांच्या हालचालीला थोडी जागा ठेवावी. 

- बाळाला सोफा किंवा आराम खुर्चीवर, स्वतःच्या अंगावर घेऊन झोपवू नये. 

- पाळणा वापरण्यास हरकत नाही, पण तो आईच्या बेडजवळ आणि जिथून आईला बाळाला सहज हात लावता येईल अशा अंतरावर असावा. 

- आपोआप हलणारे ॲटोमॅटिक पाळणे टाळावेत. 

स्तनपान आणि सडन इन्फन्ट डेथ 
- ६ महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान दिलेल्या मुलांमध्ये याचे प्रमाण कमी असते. 
- ज्या घरात किंवा आईला धूम्रपानाची सवय असते त्यांच्या मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. 

अपवादात्मक स्थितीत पोटावर झोपू द्या 
बाळाने पाठीवरच झोपायला हवे, पण वारंवार व जास्त प्रमाणात उलट्या होत असलेल्या बाळाला काही दिवस पोटावर झोपण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. उलटी टाळण्यासाठी पोटावर झोपणे बाळाला पाजल्यावर एक ते दोन तासच असावे. त्या काळातही बाळाकडे लक्ष ठेवावे. नंतर परत सरळ करून बाळाला पाठीवर झोपवावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr-amol-annadate write article about baby Sleep on back

Tags
टॉपिकस
Topic Tags: