दिलखुलास : हक्क गर्भपाताचा

शेकडो वर्षांपूर्वी कुंतीलासुद्धा आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या स्वतःच्या हाडामांसाच्या बाळाला केवळ लोकलज्जेस्तव सोडून द्यावे लागले.
abortion
abortionesakal
Summary

शेकडो वर्षांपूर्वी कुंतीलासुद्धा आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या स्वतःच्या हाडामांसाच्या बाळाला केवळ लोकलज्जेस्तव सोडून द्यावे लागले.

- कांचन अधिकारी

शेकडो वर्षांपूर्वी कुंतीलासुद्धा आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या स्वतःच्या हाडामांसाच्या बाळाला केवळ लोकलज्जेस्तव सोडून द्यावे लागले. आजही आपल्या समाजात अशा कित्येक कुंती वावरत आहेत; पण त्यांना आता गर्भपात करण्यासाठी कायद्याचा आधार मिळाला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही गर्भपातास कायद्याने अनुमती नाही. भारतात १९७२मध्ये गर्भपातविषयक कायदा करण्यात आला, ज्यात २० आठवड्यापर्यंतचा गर्भ असेल तरच गर्भपात करण्यास अनुमती होती; पण आता मात्र, २४ आठवड्यांपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे.

गर्भपात करायला कुठल्याही महिलेला आवडणार नाही; पण जर गर्भ बलात्कारातून राहिलेला असेल किंवा ती मुलगी १८ वर्षांच्या आतील असेल व विवाहित नसेल किंवा गर्भात काही दोष असेल किंवा ती महिला मानसिकदृष्ट्या सक्षम नसेल, तर तुम्ही गर्भपात करून घेऊ शकता. ही एक बाजू झाली; पण दुसरीकडे काही मुली लग्नानंतरही केवळ करिअरच्या नावाखाली गर्भपात करून हानी करून घेतात, तेव्हा मात्र वाईट वाटते. एकीकडे कित्येक जोडप्यांना लग्नानंतर मूल होण्यासाठी प्रचंड प्रयत्न व खर्च करताना आपण पाहत आहोत, तर दुसरीकडे ‘हा माझा वैयक्तिक हक्क आहे,’ या नावाखाली मनमानी करणाऱ्या हट्टी मुलीही या समाजात आहेत.

जगातील ४२ देशांत गर्भपातास कायद्याने अनुमती आहे, तर २४ देशांत आजही गर्भपातास कायद्याने अनुमती नाही.

अनेक पाश्चात्य देशांत आजही कायद्याने गर्भपातास बंदी आहे. लग्नाआधी जर एक मुलगी गर्भवती राहिली, तर समाज तिच्याकडे चक्क एक ‘चालू’ मुलगी म्हणून पाहतो. हे असे का? ज्या मुलामुळे ती गर्भवती राहिली, तो मात्र समाजात उजळ माथ्याने वावरत असतो. जे या दोघांमध्ये घडते, ते नैसर्गिक आहे, मग त्यावर समाजाने आक्षेप का घ्यावा? मुलीकडे सहानुभूतीने पाहायचे सोडून तुम्ही तिला दोषी कसे काय ठरवू शकता?

याचा पुढची काळ हा ‘लग्नसंस्था’ मानणारा नसेल, तर काय तुम्ही त्या स्त्रीचा मातृत्वाचा अधिकार हिरावून घेणार का? आणि त्या जन्मलेल्या बाळाला ‘आपलं’ म्हणणार, की दुरावा देणार? तुम्हाला काय हक्क आहे त्याला अनौरस ठरवण्याचा? जर ती स्त्री स्वतःच्या पायावर उभी असेल, म्हणजेच ती आर्थिकदृष्ट्या त्या बाळाचा सांभाळ करू शकणार असेल, तर तुम्ही त्या बाळाला आपलंसं करायला काय हरकत आहे?

वेगळ्या वाटेने चालायला धाडस व हिंमत लागते. वाटेवर कितीही खाचखळगे असले, तरी हिंमतीने त्यावर मात करावी लागते. स्त्रीला देवीचे रूप देऊन तिची पूजा करणारा हा समाज स्त्रीलाच लाथेने तुडवताना, तिच्यावर अत्याचार करताना, तिला व्यभिचारी समजतो, तेव्हा या विरोधाभासाने मन विषण्ण होते. या लेखाच्या प्रपंचाने विदान आजपासून तरी आपण प्रत्येक स्त्रीमधे देवीत्व पाहायला शिकू या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com