
भारतीयांकरिता चहा त्यांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. समस्त भारतीयांचा एका चहाच्या कपावर हलक्याफुलक्या गप्पांपासून राजकारणापर्यंत सगळ्या प्रकारच्या चर्चांचा फड जमतो. जगातल्या सर्वांत जुन्या पेयांपैकी एक असलेलं हे पेय भारतात उशिरा पोचलं, परंतु आज एकटा भारत जगातल्या सर्वांत जास्त चहा उत्पादन करणारा आणि सेवन करणारा देश आहे.
भारतीयांकरिता चहा त्यांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. समस्त भारतीयांचा एका चहाच्या कपावर हलक्याफुलक्या गप्पांपासून राजकारणापर्यंत सगळ्या प्रकारच्या चर्चांचा फड जमतो. जगातल्या सर्वांत जुन्या पेयांपैकी एक असलेलं हे पेय भारतात उशिरा पोचलं, परंतु आज एकटा भारत जगातल्या सर्वांत जास्त चहा उत्पादन करणारा आणि सेवन करणारा देश आहे. चहा उत्पादनातली सत्तर सत्तर टक्के चहा पावडर भारतातच वापरली जाते.
एक काळ असा होता, की जेव्हा ब्रिटिशांनी चहा फुकट वाटूनसुद्धा कोणी भारतीय त्याला हात लावत नसत. काही जणांनी चहा प्यायला सुरू केलं, परंतु समाज काय बोलेल या भीतीनं इतरांपासून लपवून ठेवले. चहाची पुडीसुद्धा घरात कुठेतरी लपवून ठेवली जायची, न जाणो कोणा नातेवाईकाला कुणकुण लागली तर बोभाटा होईल अशा भीतीनं! पण हळूहळू लोकांना चहा आवडायला लागला आणि घराघरात किणकिणत्या कपामधून तो राजरोसपणे सर्व्ह व्हायला लागला. हळूहळू ब्रेड आणि बनलादेखील मान्यता मिळाली आणि मोठ्या शहरांत चहासोबत ब्रून मस्का किंवा पाव खाऊन कामाला जायची सवय लागली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भारतात आलेला प्रत्येक विदेशी पदार्थ भारतीय रंगात पार बदलून जातो, तसंच चहासोबतही झालं. चहात दूध, मसाले, आलं, गवती चहा असे अनेक पदार्थ पडले आणि तयार झाला मसाला चहा. आज ‘मसाला चहा’ ही खास भारताची ओळख झाली आहे. भारतात येणारा प्रत्येक विदेशी नागरिक भारतीय मसाला चहा प्यायला उत्सुक असतो. ‘मसाला चहा’पासून अनेक पदार्थ आणि पेयांचा ट्रेंड हल्ली चलनात आहे. उदाहरणार्थ, मसाला चहा आईस्क्रीम, पुडिंग, मिल्कशेक, बोबा ड्रिंक इत्यादी. क्रिम, दूध, भरपूर बर्फ आणि थंड मसाला चहा घातलेलं ‘मसाला चाय फ्रॅपे’ मस्त लागतं. त्याची रेसिपी पाहूयात.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मसाला चाय फ्रॅपे
सहित्य - एक टेबलस्पून चहाचा मसाला, दोन चमचे चहा पावडर, अर्धा कप पाणी, पाच टेबलस्पून साखर, एक कप अमूल क्रीम, एक कप दूध, आठ ते नऊ बर्फाचे तुकडे.
कृती -
पाण्यात साखर, चहा पावडर, चहा मसाला टाकून तीन मिनिटे मंद आचेवर उकळवून घ्या आणि पाच मिनिटे झाकून ठेवा.
गाळून फ्रिजमध्ये थंड करायला ठेवून द्या.
मिक्सरमध्ये बर्फ, थंड केलेला चहा, दूध आणि क्रीम एकत्र करून फिरवून घ्या.
उंच ग्लासमध्ये ओतून त्यावर किंचित चहा मसाला भुरभुरवा.
थंडगार मसाला चाय फ्रॅपे गरमागरम स्नॅक्ससोबत मस्त लागतं.
Edited By - Prashant Patil