माय फॅशन : ‘प्रयोगशील राहा’

मला घागरा आणि चोळी खूप आवडते. दररोज घागरा नाही परिधान करता आला, तरी जेव्हा कधीतरी एखादा कार्यक्रम असतो, तेव्हा मी हा पोशाख परिधान करण्याची संधी शोधत असते.
ritika shrotri
ritika shrotrisakal
Summary

मला घागरा आणि चोळी खूप आवडते. दररोज घागरा नाही परिधान करता आला, तरी जेव्हा कधीतरी एखादा कार्यक्रम असतो, तेव्हा मी हा पोशाख परिधान करण्याची संधी शोधत असते.

- रितीका श्रोत्री

मला घागरा आणि चोळी खूप आवडते. दररोज घागरा नाही परिधान करता आला, तरी जेव्हा कधीतरी एखादा कार्यक्रम असतो, तेव्हा मी हा पोशाख परिधान करण्याची संधी शोधत असते. मला हा प्रकार खूप स्पेशल आणि फेस्टिव्ह वाटतो. एम्ब्रॉयडरी असलेला घागरा तर खूप सुंदर असतो; पण त्याच्याबरोबर अगदी साधा सिंपल ब्लाउज आणि स्कर्टसुद्धा फॅशनेबल आणि कम्फर्टेबल वाटतो. कुठलाही पोशाख चांगला दिसण्यासाठी मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते ती कपड्यांच्या फिटिंगची. कुठलाही सुंदर पोशाख असला, तरी जोपर्यंत त्याचं फिटिंग व्यवस्थित नसेल, तर तोपर्यंत तो आपल्याला चांगला दिसत नाही.

आत्मविश्वास हाच माझा फॅशनफंडा आहे. कारण, मी अशा कोणत्याही प्रकारचा पोशाख निवडत नाही, ज्यात मला अवघड वाटेल. मला कम्फर्टेबल वाटणाराच पोशाख मी निवडते, ज्यात मला आत्मविश्वास वाटेल अन् तो घातल्यावर मला आनंद होईल. खरंतर आपल्याला कोणता रंग छान दिसतो, हे प्रत्येकाला माहीत असतं. आजकाल आपल्या स्किन टोननुसार रंग निवडण्यापेक्षा मी कोणता कार्यक्रम आहे आणि माझा मूड कसा आहे, त्यानुसार कपड्यांच्या रंगांची निवड करते. मला कधी लाइट पिंक, तर कधी जेट ब्लॅक रंग मला आवडतो. रंग आणि पोशाखाची निवड करताना मी कुठल्याही एका व्यक्तीला फॉलो करत नाही. कारण, आजकाल सगळ्यांचा फॅशन सेन्स खूप छान आहे. मला नयनतारा आणि कियारा अडवानी यांचा फॅशन सेन्स आणि पोशाख खूप आवडतो.

फॅशन टिप्स

  • आपण जे कपडे परिधान करतो, त्यामध्ये कम्फर्टेबल वाटणं हा भाग खूप महत्त्वाचा आहे.

  • आपण एकच फॅशन न अंगीकारता, वेगवेगळे कपडे आणि स्टाईल नक्की ट्राय करायला पाहिजेत. कारण, त्यातून आपला वेगळा लूक समोर येऊ शकतो.

  • आपण असे कपडे परिधान करावेत, जे आपण आरशात पाहिल्यावरही आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे.

  • आपण फॅशनच्या बाबतीत नेहमीच नवनवे प्रयोग करायला हवेत.

  • आपण जे कपडे परिधान करतो, त्याचं फिटिंग व्यवस्थित असावं, तरच आपला आत्मविश्वास चांगला राहतो.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com