esakal | कुरकुरीत-चुरचुरीत : गुळाची ‘तिखट’ कथा
sakal

बोलून बातमी शोधा

कुरकुरीत-चुरचुरीत : गुळाची ‘तिखट’ कथा

कुरकुरीत-चुरचुरीत : गुळाची ‘तिखट’ कथा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- अलका हर्षद शहा, पुणे

माझे नवीनच लग्न झाले होते. आमच्या त्या एकत्र कुटुंबात गूळ पापडी (सुखडी) सर्वांना फार आवडत असे. एक दिवस सासूबाईंच्या सांगण्यावरून मी गूळपापडी केली. अतिशय छान झाली. सर्वांनाच खूप आवडली, त्यामुळे ती लवकरच फस्त झाली.

आई म्हणाल्या, ‘‘सर्वांना आवडली आहे तर कर अजून एकदा. तिथं जाऊबाईही होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘आपण दोघी मिळून करू, म्हणजे तुझी रेसिपी मला बघता येईल.’’ मग काय, नव्या नवतीचे दिवस आणि त्यात मला हरभऱ्याच्या झाडावर चढविलेले- मी उत्साहात सर्व तयारी केली. आम्ही दोघी जावा छान गप्पा मारत गूळपापडी करत होतो. त्या गप्पांच्या नादात गूळ टाकल्यावर गॅस बंद करायचा विसरला होता; पण ते काही माझ्या लक्षातच आले नाही. गूळपापडीच्या खमंग वासाने काकू लवकर खायला दे ना म्हणून बच्चे कंपनी फेऱ्या मारत होती. थंड झाल्यावर काढून खायला दिली; पण ती तर दगडासारखी कडक झाली होती. दात तुटेल; पण गूळपापडीचा तुकडा पडणार नाही अशी झाली होती.

हेही वाचा: पाणीपुरी खूप आवडीची : धनश्री काडगावकर

‘विनामूल्य दात काढून मिळेल,’ अशी घरात चेष्टा होत होती. मला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले. दोन दिवस सर्वांच्या चेष्टांना अगदी ऊत आला होता. मग आईनी ती गूळपापडी खलबत्त्यात घालून कुटली. थोड्या दुधात भिजवून परत गरम करून दुरुस्त केली. ती छानच झाली; पण हरभऱ्याच्या झाडावरून पडल्याने मी मात्र तोंडावर आपटले. आजही त्या आठवणीने हशा पिकतो

loading image
go to top