हातावर हवा फिट बँड! 

हातावर हवा फिट बँड! 

हल्ली आपण थोडं अधिकच स्मार्ट होत चाललो आहोत. स्मार्टफोनपासून झालेली स्मार्टनेसची सुरुवात आता अनेक स्मार्ट गॅजेट्सपर्यंत येऊन पोचली आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे गॅजेट म्हणजे स्मार्टबॅंड. आतापर्यंत केवळ वेळ दाखवणारं तुमच्या मनगटावरील घड्याळ आता तुम्हाला अधिक स्मार्ट बनवत आहे. मोबाईलला कनेक्ट होण्यासोबतच तुम्हाला फीटनेस फ्रिक बनवण्यासाठीही ती प्रोत्साहित करते. सध्या बाजारात अनेक कंपनीचे फिटबँड उपलब्ध आहेत. त्यापैकी काही निवडक फिटबँडविषयी जाणून घेऊया.. 

सॅमसंग गॅलेक्सी फिट २ 
सॅमसंगने नुकताच गॅलेक्सी फिट २ हा फिटबँड लॉन्च केला आहे. हा बँड एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर २१ दिवस चालतो, असा दावा सॅमसंगने केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बॅंडमध्ये हँड वॉश फीचरही देण्यात आले आहे. जो वेळोवेळी हात धुण्यासाठी सूचना करतो, तसेच त्यात वॉटर रेसिस्टेंस फीचरही दिला आहे. AMOLED डिस्प्लेसह, उत्तम व्हिजिबिलिटी, पाच ऑटोमेटिक वर्कआउट आणि सॅमसंग हेल्थ अॅप्सच्या माध्यमातून जवळपास ९० हून अधिक वर्कआउट ट्रॅक करता येतो. या फिटबँडमध्ये स्ट्रेस ट्रॅकिंगचीही सुविधा असून तुमच्या तणावावर लक्ष ठेवते. मोबाईलला जोडून म्युझिक प्लेअरला सहज ॲक्सेस करता येतो. बाजारात या फिटबँडची किंमत ३९९९ रुपये आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयटेल आयएफबी-११ 
किफायतशीर दरात वेगवेगळे गॅजेट्स सादर करणाऱ्या आयटेलने आयएफबी-११ हा नवाकोरा फिटबॅंड सादर केला आहे. एचडी कलर डिस्प्लेसह २० दिवसांची बॅटरी लाइफ या फिटबँडमध्ये दिली आहे. हा फिटबँड दिवसभरात तुम्ही किती पावले चालला, किती कॅलरीज जळाल्या, किती वेळ झोपला, या विविध बाबींवर लक्ष ठेवते. हा फिटबँड व्यायाम, जॉगिंग, स्विमिंगच्या वेळीही तुमच्या वर्कआऊटची नोंद ठेवतो. एवढेच नव्हे, तर तुमचे फोन कॉल्स, मेसेज, व्हॉट्सअॅप मेसेजचे नोटीफिकेशनही या फिटबँडवर उपलब्ध होतात. या बँडची किंमत १४९९ रुपये आहे. 

फिटबीट अल्ट्रा एचआर 
फिटबँडची मातब्बर कंपनी म्हणून ओळख असलेल्या फिटबीट कंपनीकडून किफायतशीर दरापासून ते महागड्या फिटबँडची मालिका सादर करण्यात आली आहे. त्यापैकी परवडणाऱ्या दरात अनेक फीचर असलेला बँड म्हणजे फिटबीट अल्ट्रा एचआर. या फिटबँडमध्ये इतरांप्रमाणेच फीचर दिले आहे. दिवसभरात चाललेली पावले, वर्कआऊट, झोपेची वेळ आदींवर ही बँड ट्रॅक ठेवते. अॅण्ड्रॉईड आणि आयफोनला सहायकारी असलेली हे फिटबँड तुमचे फोनकॉल्स, मेसेज, व्हॉट्सअॅप मेसेजचे नोटिफीकेशनही तुम्हाला देते. ब्लूटूथ कनेक्शनचे फीचरही या बँडमध्ये देण्यात आले असून, याची किंमत ४,९९९ रुपये आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com