घरातून शिक्षण आणि स्मार्टफोन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

कोरोना महामारीने जग अनेक अर्थांनी बदलून टाकले आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक उत्पादनांच्या वापरातही नवे ट्रेंड आले आहेत. यातील सगळ्यात मोठा बदल शैक्षणिक क्षेत्रात दिसून आला.

कोरोना महामारीने जग अनेक अर्थांनी बदलून टाकले आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक उत्पादनांच्या वापरातही नवे ट्रेंड आले आहेत. यातील सगळ्यात मोठा बदल शैक्षणिक क्षेत्रात दिसून आला. व्यावसायिक कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रमांचा उपयोग होत असून, अनेक जण शाळेसाठी फोन व अन्य डिजिटल उपकरणे वापरत आहेत. ‘फ्लिपकार्ट’च्या ताज्या अहवालात भारत घरातूनच कसा शिक्षण घेत आहे, हे दिसत असून स्मार्टफोन विभागातील काही रंजक निष्कर्षही समोर आले आहेत. 

परवडणाऱ्या स्मार्टफोन्सना मागणी 
लोक सध्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवत असून, प्रत्येकाच्या मनोरंजन, व्यावसायिक आणि शैक्षणिक गरजा वेगवेगळ्या असल्याने एकाच घरात एकाच प्रकारच्या अनेक उपकरणांची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे सर्वजण बजेटबाबत जागरूक झाले आहेत. स्मार्टफोन घेताना तो महत्त्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे, केरोनापूर्व काळाच्या तुलनेत जूनपासून ‘फ्लिपकार्ट’वर १० हजार रुपयांखालील उत्पादनांच्या शोधाचे प्रमाण ६० टक्क्यांनी वाढले आहे. फ्लिपकार्टच्या ५ कोटी १० लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी १० हजार रुपयांखालील बजेट स्मार्टफोनमध्ये रुची दाखवली आहे. या विभागात ५००० mAh बॅटरी आणि ६.२२ इंची स्क्रीन हे मापदंड ठरले आहेत. अनेक ब्रँड्सनी याच किमतीत ६००० mAh बॅटरी आणि ६.८२ इंची डिस्प्लेचे फोन सादर केले आहेत. फोनवर एकाच वेळी अनेक कामे केली जात असल्याने बॅटरीच्या कालावधीबाबत तडजोड करता येत नाही. फ्लिपकार्टवर बॅटरीशी संबंधित बाबींच्या शोधाचे प्रमाण मार्चपासून दुप्पट झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकप्रिय निवडी 
या काळात अनेक ब्रँड्सनी अनेक तास सहज चालतील असे नवे फोन आणले. यामध्ये 
- रीअलमीची सी सीरिज (सी२ आणि सी३), 
- शाओमीची रेडमी ८ आणि ८ए आणि इन्फिनिक्सची हॉट सीरिज. 
- त्याचप्रमाणे गिओनी, आयटेल आणि टेक्नो या फ्लिपकार्टवरील नव्या कंपन्यांचाही समावेश आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन्सच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी रीअलमीने त्यांच्या लोकप्रिय सी सीरिजमध्ये (रीअलमी सी११, सी१२ आणि सी१५) तीन नवे फोन सादर केले. यात बॅटरी (६००० mAH पर्यंत) आणि डिस्प्लेचा (६.५३ इंचीपर्यंत) समावेश आहे. 

इन्फिनिक्सने आपली अत्यंत लोकप्रिय हॉट सीरिज आता इन्फिनिक्स हॉट ९ आणि हॉट ९ प्रो अशी विस्तारली आहे. या दोन्ही फोनमध्ये ५००० mAHची बॅटरी आणि ६.६ इंची डिस्प्ले आहे. त्यांनी इन्फिनिक्स स्मार्ट ४ प्लस हा अत्यंत परवडणाऱ्या दरातील फोन आणला आहे. प्रामुख्याने घरातून शिकण्यासाठी वापर यावर या फोनचा भर आहे. या फोनमध्ये ६.८ इंची स्क्रीन आणि ६००० mAHची बॅटरी आहे. जिओनीने जिओनी मॅक्स या स्मार्टफोनद्वारे भारतीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे आयटेल व्हिजन १३ जीबी, टेक्नो स्पार्क पॉवर २ आणि टेक्नो स्पार्क पॉवर गो २०२० या फोन्सनाही मागणी आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वाधिक मागणी असलेली राज्ये 
- उत्तर प्रदेश 
- बिहार 
- पश्‍चिम बंगाल 

एकूण मागणीतील ७० टक्के वाटा द्वितीय श्रेणी आणि त्याखालील शहरांचा आहे. गोरखपूर, रायपूर, सिवान, देवरिया, हिस्सार, मेदिनीपूर आणि आझमगढ अशी शहरेही यात आहेत. त्याचबरोबर वॉरंटी असिस्टंट प्रोग्रामसारख्या परवडणाऱ्या दरांशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये ‘फ्लिटकार्ट’वर वाढ झाली आहे. या उपक्रमामुळे वापरकर्त्याला अवघ्या ९९ रुपयांमध्ये घरबसल्या ब्रँडची वॉरंटी सेवा उपलब्ध होते. प्रॉडक्ट एक्सचेंजमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या काळात ‘फ्लिपकार्ट’ने देशभरात लोकांच्या स्मार्टफोनच्या  वाढत्या मागण्या पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असून उत्पादनांची सुरक्षित आणि निर्जंतुक पुरवठासाखळी कायम राखत डिलिव्हरी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about online education and smartphones