लूक 'फॅब' : फिटनेस म्हणजे काय?

Fitness
Fitness

फिटनेस म्हणजे काय आणि त्याचा शरीराला काय फायदा आहे, याबद्दल माहिती घेऊयात. मला अनेकजण विचारतात, ‘माझ्या फिटनेससाठी कोणता व्यायाम, आहार योग्य आहे?’ हे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला विचारावेसे वाटते, ‘फिटनेस या शब्दाबद्दल तुम्ही काय विचार करता?’

1) मला उत्साहवर्धक वाटते.
2) माझी शरीरयष्टी सुबक दिसते.
3) मी वेदनामुक्त जगू शकतो.
4) किंवा सामाजिक आवश्‍यकता.

असो, फिटनेसबद्दल आपल्या मनातील व्याख्या निश्‍चित करूयात. त्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.
 स्नायूंची शक्ती वाढते.
 पाठीचा कणा कणखर किंवा योग्य ठेवला जातो.
 दैनंदिन जीवनातील कार्य करण्यासाठी गती मिळते.
 शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे.
 मन आणि मज्जासंस्था आपल्या स्नायूंना जोडले जातात.
 तणावमुक्ती.

अरे बापरे, एक तासाच्या व्यायामात एवढे सारे? हे तर एकाच वेळी अनेकविध कामे करण्यासारखे आहे. अर्थात, हीच तुमच्या ‘फिटनेस’ची योग्य व्याख्या आहे. त्यामध्ये सहनशक्ती, सामर्थ्य, संतुलन आणि लवचिकतेचा समावेश क्रमप्राप्त आहे.

आपल्यातील मर्यादा लक्षात घेऊन फिटनेस निश्‍चित करावा.
 दररोज एक तास व्यायाम आवश्‍यकच आहे.
 फिटनेससाठी जीम, योगासने, प्रशिक्षण, धावणे, कोणताही खेळ आदी पर्याय आहेत. यापैकी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. अर्थात तत्पूर्वी कोणतीही इजा होऊ नये यासाठी ‘वॉर्मिंग’ करावे.
 आपला फिटनेस गांभीर्याने नियंत्रित केला पाहिजे. मित्रांबरोबर सहजतेने फिरतो, कुटुंबाची काळजी घेतो, त्याप्रमाणे फिटनेसकडे पाहावे.
 तुम्ही तंदुरुस्त असल्याशिवाय आसपासच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक आधार देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या शरीरावर योग्य पद्धतीने आरोग्यमय संस्कार केले पाहिजेत. ते करण्यासाठी या आठवड्यात शरीराला पूरक ठरतील अशा चार व्यायाम पद्धतींची निवड करा व त्याला प्राणायामाची जोड द्या.

सुरुवात कशी करायची?
१) वॉर्मअप
२) बळकटीकरणासाठी प्रशिक्षण
३) कार्डिओ बुस्ट
४) शरीराला ताण देणे.
५) एकाग्रचित्ताने प्राणायाम करणे.
६) योग्य विरंगुळा/विश्रांती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com