गॅजेट्स : इंटरनेट ब्राऊझिंगही आता अस्सल भारतीय

Internet-Browsing
Internet-Browsing
Updated on

आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय डेटा सुरक्षेसाठी केंद्र सरकारने नुकतेच अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली. त्यानंतर तत्सम ॲप्सला देशी पर्याय म्हणून अनेक ॲप्स उपलब्ध होत आहे. आता केवळ ॲप्सच नाही, तर चक्क ब्राऊझरही अस्सल भारतीय असणार आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट एज, बिंग, ओपेरा मिनी यांच्या स्पर्धा करण्यासाठी जिओ ब्राऊझरची घोषणा झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुगलशिवाय आपल्याकडे अन्य पर्याय म्हणजे बिंग, एज, याहू सर्च किंवा ओपेरा मिनी आहेत, मात्र सध्या सर्वाधिक वापरात आहे ते गुगल. परंतु सध्या आत्मनिर्भर भारताला समर्थन म्हणून अस्सल भारतीय वेब ब्राऊझर लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्याचे नाव आहे ‘जिओ ब्राऊझर’.

रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्मने डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यासाठी जिओ ब्राऊझर सादर करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. सुरुवातीला अँड्रॉइड मोबाईल धारकांसाठी जिओ ब्राऊजर बीटा व्हर्जनच्या रूपात सादर केले आहे. म्हणजे गुगल प्ले स्टोअरवर जिओ ब्राऊझरचे बीटा व्हर्जन उपलब्ध झाले आहे. ब्राऊझरवर सर्चिंग सहज आणि सोप्या पद्धतीने व्हावे म्हणून जिओ ब्राऊझरमध्ये मल्टी प्रोसेस क्रोमियम ब्लिंक इंजिनचा वापर करण्यात आला आहे. जिओ ब्राऊझरमध्ये प्रायव्हेट ब्राऊझिंग मोडची सुविधा दिली आहे. म्हणजे प्रायव्हेट मोडमध्ये सर्चिंग करताना आवश्यक असलेल्या लिंक्स आणि त्याबाबतची माहिती त्यात बुकमार्क स्वरूपात सेव्ह करून ठेवता येतो. त्याशिवाय गुगलप्रमाणेच यामध्येही डाऊनलोड मॅनेजर, क्विकलिंक्स म्हणजे आपण सर्वाधिक भेट देत असलेली संकेतस्थळंही पिन करून ठेवता येतात.

अन्य वैशिष्ट्ये

  • वेगवान ब्राऊजिंग स्पीड.
  • प्ले-स्टोअरवर अवघ्या २७ एमबीमध्ये उपलब्ध.
  • विविध भाषेत सर्चिंग करण्याची सुविधा.
  • थेट सर्चिंगसाठी क्यूआर कोड सर्चची सोय.
  • शोधलेल्या माहितीमध्ये नेमकी माहिती शोधण्यासाठी ‘फाईंड इन पेज’ पर्याय.
  • क्विक शेअर, डेस्कटॉप मोड, बॅटरी सेव्हिंग मोड, व्हॉइस सर्च, प्रिंट, डार्क मोड, एक्झिट मोडचीही सुविधा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com