वेब दुनिया : अश्लिलतेचा ‘रसभरी’त कडेलोट

Rasbhari
Rasbhari

चित्रपटगृहं बंद असल्यानं ‘ओटीटी’कडं लोकांचा कल वाढला आहे. ओव्हर द टॉपवरील (ओटीटी) नेटफ्लिक्स, हॉटस्टार, वूट, झी-५, ॲमेझॉन प्राईम हे ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रिमिंग ॲप्स सध्या अव्वल स्थानावर आहेत. ॲमेझॉन प्राइमवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘रसभरी’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांपाठोपाठ अभिनेत्री स्वरा भास्करही वेबसीरिजकडं वळली आहे. ‘रसभरी’मध्ये तिच्यासह आयुष्मान सक्सेना, रश्मी अगडेकर, चित्तरंजन त्रिपाठी, नीलू कोहली, प्रद्युम्न सिंह, सुनिक्षी ग्रोवर यांच्याही भूमिका आहेत. निखिल भट्ट यांनी सीरिज दिग्दर्शित असून, स्वरा इंग्रजी शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ही कथा. नंदकिशोर त्यागी ऊर्फ नंद हा शाळेतला आणि वयात आलेला मुलगा मस्तीत जगतो आहे. एन्ट्री होते नवी शिक्षिका शानू बंसलची. शानूच्या येण्यानं शहरातलं वातावरण बदलायला लागतं. शाळेच्या मुलांपासून अनेक पुरुषमंडळी शानूच्या सुंदरतेवर भाळतात. यात प्रियांका या मुलीचं मजेशीर पात्रदेखील येतं. प्रियांका नंदच्या प्रेमात पडते. मात्र, शानूच्या सौंदर्यावर भाळलेला नंद तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू इच्छितो. त्यामुळं कथेमध्ये ‘लव्ह ट्रॅंगल’ येतो. कथेच्या ओघात विशिष्ट वयोगटात तरुणांच्या मनात स्त्रियांविषयीच्या विचारांवर उपहासात्मक पद्धतीनं भाष्य केलं आहे. शाळेतील तरुण मुलं, अभ्यास आणि प्रेम यांच्याविषयीची ही सीरिज आहे, परंतु या संकल्पनेपासून खूप दूर जात प्रेक्षकांसमोर केवळ अश्लिलता मांडण्याचा 
प्रयत्न दिसतो.

खरंतर, शाळा म्हटल्यावर डोळ्यांसमोर येणाऱ्या सुंदर आठवणी, शिक्षक, अभ्यास, मजा-मस्ती असं वातावरण सीरिजमध्ये दिसत नाही. याउलट सेक्सविषयीच्या टिप्स देणारा, त्यासाठी मदत करणारा शिपाई आणि शिक्षिकेला आपल्या मुलाची आई करण्याची इच्छा ठेवणारा नंद पाहायला मिळतो. एका प्रसंगात पुरुषमंडळी मद्यपान करत असताना दाखविले असून, तिथंच त्यांच्या बायकाही बसल्या आहेत. एक लहान मुलगी तिला नाचायचं असल्याचं आईला सांगते. मुलीची आई तिला पुरुषांसमोर नाचायला सांगते.

त्यावर एक महिला म्हणते, ‘थोडा बहुत नाच गाना लडकियों को आना चाहिए, कल को अपने पति को रिझाए रखेगी.’ यावर सेन्सर बोर्डचे अध्यक्ष, लेखक, कवी प्रसून जोशी यांनी ट्विट करत टीकेची झोड उठवली. त्यावर प्रतिक्रिया देताना स्वरा म्हणाली, ‘सर, तुम्ही या दृश्यांना चुकीचं समजत आहात. यात जे दाखण्यात आलंय ते याच्याविरुद्ध आहे. ती मुलगी तिच्या मर्जीनं डान्स करतेय. बघणारे मात्र उत्तेजक नजरेतून पाहत आहेत. या दृश्‍यात हाच विरोधाभास दाखवला आहे.’ 

सोशल मीडियावरही नेटिझन्सकडून सीरिजविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. कथेचा अभाव आणि तिला दुहेरी अर्थाचे जोक, अश्लिलता यांची फोडणी असा सारा मामला आहे. दरम्यान, स्वरानंदेखील तिच्या वडिलांना, ‘डॅडी, कृपया मी समोर असताना ही वेबसीरिज पाहू नका.’ असं सांगितलं होतं. स्वराला स्वतःचं काम कुटुंबाला दाखवणं लज्जास्पद वाटतं, तिथं रसिक ही वेबसीरिज कुटुंबासोबत पाहणं कसं पसंत करतील, अशा संतप्त प्रतिक्रिया नेटिझन्समध्ये उमटल्या. 

स्वराचा अभिनय अतिशय सामान्य आणि नकोसा वाटतो. नंदची भूमिका साकारणारा आयुष्मान सक्सेना अभिनयात मुरलेला दिसतो, मात्र तो वाईट कथेमध्ये हरवून जातो. प्रियंकाच्या भूमिकेतील रश्मी अगडेकरचा अभिनयही चांगला आहे, पण इतर सर्व कलाकार खूप सामान्यच वाटतात. निखिल भट्ट यांनी काही नवीन किंवा अनपेक्षित केलेलं नाही. ‘रसभरी’ अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओसारख्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास योग्य आहे का, असा प्रश्नही मनात येतो. शाळा आणि शिक्षक या विषयाला अश्लिलतेच्या नावाखाली दाखविण्याचा किळसवाणा प्रकार ‘रसभरी’मध्ये पाहायला मिळतो. ‘क्रिएटिव्ह लिबर्टी’च्या नावावर अश्‍लिलता विकण्याचा हा प्रयत्न चुकीचाच. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com