टिवटिवाट : आशेचे किरणही सोशल मीडियावरच...

Sakal-Media
Sakal-Media

सोशल मीडियातून कोरोना विषाणूबद्दल गैरसमज, अपमाहिती पसरत असल्याच्या धोक्याबद्दल आपण बोलतो आहोतच; आज सत्य, अधिकृत आणि जबाबदार माहितीबद्दल बोलूया. हजारो संशोधक कोव्हिड १९ आजारावर सुरू असलेल्या संशोधनाची माहिती जगभरात पोचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहेत. कोव्हिड १९ च्या लसीची प्रगती कळविण्यासाठी केवळ संशोधकच नव्हे; औषध उत्पादन कंपन्याही ट्विटचा आधार घेत आहेत आणि नकारात्मकतेच्या गर्तेतून जगाला बाहेर काढण्यासाठी आशेचा किरण दाखवत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भारतासह कित्येक देशांनी नागरीकांपर्यंत नेमकी माहिती, सल्ला, सूचना पोचविण्यासाठी ट्विटरचा वापर केलाय. विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची लक्षणे बदलली आहेत, हे सांगण्यासाठी ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य योजनेला (एनएचएस) सोशल मीडिया आवश्यक वाटतो. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) कोरोनासंदर्भातील प्रत्येक माहिती आधी सोशल मीडियावर प्रसिद्ध करते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कोणत्या काळात किती वाढेल, हे सांगणारी मॉडेल्स ट्विटवरून जगाच्या कानाकोपऱ्यात पोचत आहेत.

अपमाहितीचा सामना केवळ वापरकर्त्यालाच करावा लागतो आहे, असं नाही. ट्विटर, फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनाही करावा लागतो आहे. या प्लॅटफॉर्मच्या विश्वासार्ह्यतेला अपमाहितीचा धोका पोहोचतो आहे. उशिराने का होईना हे सत्य समजल्यानं असावं, पण विशेषतः ट्विटर "फेक आणि फॅक्ट''बाबतीत कमालीचे जागरूक झाले आहे. डासांद्वारे कोरोनाचा प्रसार होतो, अशी अपमाहिती गेल्या आठवड्यात पसरविण्यात सोशल मीडियाचा वाटा होता. डासांमुळं असं काही होत नाही, हे सांगण्यासाठी ट्विटरनं जाणिवपूर्वक ‘फॅक्ट’चा प्रसार केला.

भारतापुरता विचार केला, तर गेल्या दोन महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारांमधील बहुतांश विभाग ट्विटरवर दाखल झाले आहेत. प्रत्येक विभागाने त्यांच्यापरीनं कोरोनाबद्दलच्या जनजागृतीत आपापला वाटा उचलला आहे. माहिती आणि अपमाहितीचाही प्रवाह अफाट वाहतो आहे. या प्रवाहातून नेमकं काय उचलायचं, हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com