गॅजेट्स : वेध 5G मोबाईल्सचे...

5G-Mobiles
5G-Mobiles

तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा वेग जेवढा अधिक, तेवढे तुम्ही अधिक ‘अपग्रेड’ समजले जाता. इंटरनेटचा वेग अवलंबून असतो तो तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरवर. ती तुम्हाला ‘फोर-जी’ सेवा देते की ‘फाइव्ह-जी’ यावर. सध्या देशात ‘फोर-जी’चे नेटवर्क उपलब्ध असले, तरी प्रत्यक्षात इंटरनेटच्या स्पीडबाबतची ओरड कायमच असते. अशातच आता आपल्या देशात ‘फाइव्ह-जी’ इंटरनेटसेवेचे वेध लागले आहेत. त्यासाठी काही कंपन्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. दरम्यान, ‘फाइव्ह-जी’ तंत्रज्ञान भारतात येईल तेव्हा येईल; मात्र फाइव्ह जी मोबाईल बाजारात दाखल झाले आहेत. जाणून घेऊया काही निवडक ‘फाइव्ह-जी’ मोबाईल्सबद्दल... 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Specifications

  • डिस्प्ले 
  • प्रोसेसर 
  • रॅम
  • स्टोरेज 
  • कॅमेरा 
  • फ्रंट कॅमेरा 
  • बॅटरी
  • ऑपरेटिंग सिस्टिम
  • किंमत

वन प्लस नॉर्ड
वनप्लस या लोकप्रिय मोबाईल ब्रॅंडने वनप्लस नॉर्ड या किफायतशीर दरातील मोबाईलमध्ये फाइव्ह-जी तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरी असलेल्या या मोबाईलमध्ये ड्युएल सेल्फी कॅमेरा आणि चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप दिला आहे. ६.४४ इंची फुल एचडी एमोल्ड डिस्प्ले हा या मोबाईलचा यूएसपी आहे. या मोबाईलची किंमत २७९९९ पासून सुरू होते. 

  • ६.४४ एचडी एमोल्ड डिस्प्ले 
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५जी 
  • ८ GB 
  • १२८ GB 
  • ४८MP + ८MP + ५MP + २MP 
  • ३२MP + ८MP 
  • ४११५mAh 
  • ॲण्ड्रॉइड १० 
  • २७,९९९ रुपये

आसूस आरओजी फोन ३
मोबाईलवरील गेमिंगप्रेमींसाठी खास सादर केलेल्या आसूस आरोजी फोन ३ या मोबाईलमध्येही फाइव्ह-जी तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. तब्बल ६००० एमएएच बॅटरी ३० वॉट सुपरफास्ट चार्जिंग करण्यास साह्य करते. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरीसह येणाऱ्या या मोबाईलची किंमत ४६९९९ रुपये इतकी आहे. 

  • ६.४४ एचडी एमोल्ड डिस्प्ले 
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५जी 
  • ८ GB 
  • १२८ GB 
  • ६४MP + १३MP + ५MP 
  • २४MP 
  • ६०००mAh 
  • ॲण्ड्रॉइड १० 
  • ४६,९९९ रुपये

मोटोरोला एज + 
मोटोरोलानेही फाइव्ह-जी तंत्रज्ञानाला साह्य करणारा मोबाईल बाजारात आणला आहे. तब्बल १०८ मेगापिक्‍सलचा कॅमेरा हे या मोबाईलचे खास वैशिष्ट्य आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीची जबरदस्त मेमरीमुळे हा मोबाईल जणू एक छोटा संगणकच आहे. या मोबाईलची किंमत आहे सुमारे ६४९९९ रुपये. 

  • ६.४७ एचडी डिस्प्ले 
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५
  • १२ GB 
  • २५६ GB 
  • १०८MP + १६MP + ८MP 
  • २५MP 
  • ५०००mAh 
  • ॲण्ड्रॉइड १० 
  • ६४,९९९ रुपये

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com