फॅशन टशन : हेअर ड्रायर वापरताना...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 December 2020

केस उन्हात सुकवणे हा पर्याय नैसर्गिक आणि उत्तम असला, तरी अनेकदा आपल्याला लवकर निघायचे आहे किंवा ऊन आहे अशा वेळेस हेअर ड्रायर केस सुकवण्यासाठी मदत करतो. हेअरस्टाईल करतानाही आपण अनेकदा हेअर ड्रायरचा वापर करतो. पण, नियमितपणे हेअर ड्रायरचा वापर करीत असल्यास, तुम्हाला त्याचे दुष्परिणामही पाहायला मिळतील.

केस उन्हात सुकवणे हा पर्याय नैसर्गिक आणि उत्तम असला, तरी अनेकदा आपल्याला लवकर निघायचे आहे किंवा ऊन आहे अशा वेळेस हेअर ड्रायर केस सुकवण्यासाठी मदत करतो. हेअरस्टाईल करतानाही आपण अनेकदा हेअर ड्रायरचा वापर करतो. पण, नियमितपणे हेअर ड्रायरचा वापर करीत असल्यास, तुम्हाला त्याचे दुष्परिणामही पाहायला मिळतील. कारण, हेअर ड्रायरमधून निघणारी उष्ण हवा थेट आपल्या केसांच्या मुळाशी जाते. त्यासाठीच योग्य ती खबरदारी घेऊन हेअर ड्रायर वापरणे कधीही योग्य!

  • हेअर ड्रायर वापरण्याची शक्यता आहे, असे लक्षात आल्यास केसांना कंडिशनर लावायला विसरू नका. यामुळे केस गळणार आणि तुटणार नाहीत.
  • हेअर ड्रायरच्या उष्णतेमुळे त्रास होऊ नये, यासाठी आधी केसांना नरिशमेंट सीरम लावून घ्यावे.  
  • हेअर ड्रायरचा वापर करताना थेट केसांच्या मुळाशी (स्काल्प) वापरू नका. ते सरळ धरून फक्त केसांवर हवा लागेल याची काळजी घ्या. कारण स्काल्पला यामुळे हानी पोचू शकते. 
  • ड्रायर वापरताना शक्यतो लाकडी कंगव्याचा वापर करा, यामुळे केसांचे जास्त नुकसान होत नाही.
  • हेअर ड्रायर वापरताना ते केसांपासून किमान ९ इंच लांब ठेवून वापरावे. यामुळे केसांच्या मुळाशी थेट उष्ण हवा जाणार नाही.
  • तुमचे केस रूक्ष किंवा कोरडे असल्यास ड्रायरचा वापर कमी करा. वापरणे टाळल्यास, उत्तमच! वापरायचे असल्यास कोल्ड ड्रायर वापरा. या ड्रायरमध्ये उष्णता कमी असते.
  • केसांसाठी हेअर ड्रायर वापरणे आवश्‍यक असल्यास केसांना नियमितपणे तेल लावा, जेणेकरून केसांना पुरेसे पोषण मिळेल. ड्रायरचा जास्त वापर केल्याने, ड्रायर केसांमधील पोषण काढून घेत असतो. त्यासाठी केसांचे चांगले पोषण करा. 
  • केसांसाठी चांगला आहार ठेवा. जेणेकरून तुम्ही काही केमिकल्स अथवा ड्रायर, स्ट्रेटनर सारखी उपकरणे केसांसाठी वापरत असलात तरी ते जास्त हाणी पोचवू शकणार नाही. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write on using a hair dryer

Tags
टॉपिकस
Topic Tags: